Saturday, May 29, 2021

पाईप लाइन फुटली
 नगर दि 30 

आज रविवार दि. ३० रोजी मध्यरात्री १२.३५ वाजता नगर शहर पाणी पुरवठा योजनेची नविन मुख्य जलवाहीनी ( ८०० एम. एम. एम. एस. ) विळद पंपींग स्टेशन येथे पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटलेली आहे. 

सदरहू जलवाहीनी दुरुस्तीचे काम महानगर पालीके मार्फत मध्य रात्रीच सुरू करण्यात आलेले आहे.तसेच तत्पुर्वी विळद पंपींग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने रात्री ९.३० वाजलेच्या सुमारास अर्धा तास विज पुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे शहर वितरणा साठीच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झालेले नाही. 


 आज रविवार दि३० रोजी रोटेशन नुसार शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर ' लालटाकी' दिल्लीगेट' चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ' कापड बाजार , आनंदि बाजार, नवीपेठ, माणिक चौक , सावेडी गावठाण व बालिकाश्रम रोड या भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो सोमवार दि.३१ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. 


तसेच आज दि.३0 रोजी सर्व उपनगर भागांना उशिराने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल.


तसेच सोमवार दि.३१/०५/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा उदा . झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा' रामचंद्र खुंट' कोठला' माळीवाडा' इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास मंगळवार दि.०१/०६/२०२१ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.


तरी नागरीकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आवाहन महानगर पालीकेने केलेले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only