Tuesday, May 18, 2021

लाच घेताना पोलिसाला पकडले

 




नगर 19प्रतिनिधी


एका आरोपीच्या विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी अकोल्याचे पोलीस नाईक संदीप पांडे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.



आरोपी संदिप भाऊसाहेब पांडे (वय 33,  पोलीस नाईक  ब.नं. 1681, नेमणूक - अकोला पोलीस स्टेशन, नगर) असे आरोपीचे नाव आहे.



तक्रारदार यांचे साडु व त्यांच्या दोन मुलांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपी विरुद्ध चॅप्टर केस  लवकर करुन त्यांचा लगेच जामीन करुन देण्यासाठी व त्यातील उर्वरित एक आरोपी चे विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे  5हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन आज केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपीने तक्रारदार लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अकोला पोलीस स्टेशन येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपीने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.


ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, दिपक करांडे आदींच्या पथकाने केली.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only