Tuesday, June 29, 2021

राहाता येथील वृद्ध दाम्पत्यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केले तर गजाआडनगर दि 29 प्रतिनिधी


  राहाता तालुक्यातील  कोऱ्हाळे  येथे वृध्द दापंत्याची हत्या करणाऱ्या तीन आरोपीना   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिथlफीने अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.


बेंद्रया उर्फ देवेन्द्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले, वय २८ वर्षे, रा. पढेगांव, ता. कोपरगाव,

दिलीप विकास भोसले, वय १९ वर्षे, रा.कोपरगाव,  आवेल विकास भोसले रा.कोपरगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे .
. प्रमोद शशिकांत चांगले, वय ३२ वर्षे, रा. चांगले वस्ती, वाळकी रोड, कोन्हाळे, ता. राहाता यांचे वडील शशिकांत श्रीधर चांगले, वय ६० वर्षे, व आई सिंधुबाई शशिकांत चांगले, वय- ५० वर्षे असे दोघे कोन्हाळे येथील त्यांचे शेतातील वस्तीवर रहावयांस होते.  आई वडील व चुलते यांचेमध्ये शेतीचे कारणावरून बऱ्याच दिवसापासून वाद चालू होते. दि. २५ जून  रोजीचे रात्री प्रमोद यांचे  आईवडील त्यांचे घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या आई वडीलांच्या डोक्यामध्ये फावड्याने मारुन गंभीर जखमी करुन त्यांची झोपेमध्ये असतानाच हत्या केली होती.

सदर घटनेबाबत  राहाता पो.स्टे. येथे शेतीचे वादाचे कारणावरुन कोणीतरी अज्ञात इसमांनी आई वडीलांची हत्या केले बाबत दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १५९ / २०२९ भादवि कलम ३०२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.राहता तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी दोन जणांचा हत्या करण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला दिल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल पथकाची नियुक्ती करून ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती सदर आरोपी है सराईत गुन्हेगार असावे असा पोलिसांचा संशय होता त्या दृष्टिकोनातून तपासाची सूत्रे फिरली होती.शेतीच्या  वादाचे कारणाव्यक्तिरिक्त सदरचा गुन्हा हा इतर कोणत्या कारणामुळे घडला आहे काय ? या बाजुने देखील तपास सुरु केला होता,


सदरचा गुन्हा हा सदरचा गुन्हा केंद्रया भोसले, रा. पढेगाव, ता. कोपरगाव याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती त्यानंतर पोलीसानी सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी  बेंद्रया उर्फ देवेन्द्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले, वय २८ वर्षे, रा. पढेगांव, ता. कोपरगाव यांस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वसात घेवून सदर ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला होता, त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार  दिलीप भोसले, आवेल भोसले, मायकल चव्हाण व डोंगन्या चव्हाण अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर माहितीचे आधारे आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवून आरोपी  दिलीप विकास भोसले, वय १९ वर्षे, रा. जवळके, ता. कोपरगाव, आवेल भोसले यांना अटक केली.


 सदरची कारवाई विभागाचे पोलीस निरीक्षक  अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ  दत्तात्रय हिंगडे,  विश्वास बेरड, सुनिल चव्हाण, सुरेश माळी,  संदीप पवार,  शंकर चौधरी, संतोष लोढे, विशाल दळवी, सचिन आडबल, दिनेश मोरे, दिपक शिंदे,  संदीप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमूल, रविन्द्र घुंगासे, रणजित जाधव, जालिंद माने, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, आकाश काळे, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, रोहिदास नवगिरे, मच्छिन्द्र बर्डे, चालक  अर्जून बढे, संभाजी कोतकर, बबन बेरड यांनी केली.


 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only