Saturday, June 26, 2021

राहत्यात पती-पत्नीची निर्घृण हत्याराहत्यात पती-पत्नीची निर्घृण हत्या

को-हाळे ( वार्ताहर )- पती पत्नीची रात्री झोपेत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना राहाता तालुक्यातील को-हाळे येथे घडली. या दुहेरी हत्याने जिल्हा हादरला.

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय 60)  तर सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55 ) या पती-पत्नीची रात्री झोपेतच निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती- पत्नी शेतकरी असुन कालच हे पति-पत्नी आपल्या मुलांना भेटून घरी आले होते. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे  दाम्पत्य आज  लवकर का उठले नाही म्हणून शेजरच्यानी घरी जाऊन पहिले तर दोघेही रक्तने माखलेले होते आणि त्यांच्या डोक्या जवळ पावडे रक्तानी भरलेले होते.हे पाहिल्या नंतर स्थानिकानी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली. राहाता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस अध्यक्ष दिपाली काळे आणि पोलीस उपअधिकारी संजय सातव हे मोठ्या पोलीस फ़ौज फात्यासह घटनास्थळी दाखल झाले. या पती-पत्नीवर पावड्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती समोर येत असुन यांच्या हत्याच्या मागचे कारण आद्यपही अस्पष्ट असुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only