Sunday, June 27, 2021

शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण, काँग्रेसबाबतमाहिती नसल्याचा दावा



शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर

आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण, काँग्रेसबाबतमाहिती नसल्याचा दावा


अहमदनगर/प्रतिनिधी-महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या जुळवूनघेण्याच्या सूचनेनुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौरअसे ठरले आहे. येत्या एक-दोन दिवसात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ येथे येऊनउमेदवारी व अन्य नियोजन जाहीर करतील, असे स्पष्टीकरण शहराचे राष्ट्रवादीचेआमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिले. दरम्यान, काँग्रेसबाबत आपल्याला काहीहीमाहीत नाही. पण, ते जर आमच्या समवेत आले तर त्यांनाही बरोबर घेतले जाईल, असेहीत्यांनी स्पष्ट केले.नगरच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक 30 जूनलाऑनलाईन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आ. जगताप यांनी,महापौर-उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत मला आता काहीसांगता येणार नाही. पण मुंबईत वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनेनुसार निवडीहोणार आहेत आणि तसे मध्यंतरीच्या मुंबईतील वरिष्ठांच्या भेटीची छायाचित्रेहीहे स्पष्ट करून गेले आहे, असे स्पष्ट केले.


 शिवसेनेच्या काही नगरसेवकांशीमाझी चर्चा झाली आहे. या दोन्ही पक्षांची समन्वय समिती केली असून, तिचे प्रमुखपद स्थायीसमिती सभापती अविनाश घुले पाहतात, ते दोन्ही पक्षांच्या सर्व संबंधित नगरसेवकांच्यासंपर्कात आहेत, असे सांगून आ. जगताप म्हणाले, माझ्या काही हातात नाही व मीउमेदवारही नाही. लोकशाही प्रक्रियेनुसार निवड होत असते. नगरसेवक सर्व ठरवतअसतात. अर्थात माझ्याही मताला किंमत असते. पण जेव्हा आमच्या नगरसेवकांना काहीअडचण नाही, तेव्हा मला असायचे काही कारण नाही. नगरसेवकांनी जर वेगळी भूमिकामांडली तर मला काही लोकांशी चर्चा करावी लागते. पण बहुतांश निर्णय नगरसेवकचघेतात, असेही आ. जगतापांनी सांगितले.


भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर असा काहीविषय नव्हता. वरच्या सूचनांनुसारच व जुळवून घेण्याच्या आदेशानुसारच हे सारे सुरूआहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याचा विषय आला नाही. आता मनपा सत्तेतराष्ट्रवादी उपमहापौरपदाच्या माध्यमातून सहभागी होणार आहे व ते नावही पक्षाचे नेतेजाहीर करतील, असे सांगून आ. जगताप म्हणाले, सत्तेतील काँग्रेस सहभागाबद्दल मी निर्णयकसा घेऊ शकतो? पण ते येत असतील तर त्यांना समवेत घेतले जाईल, कारण, त्यांच्यामाध्यमातून त्या-त्या भागाच्या विकासाला चालना मिळते. शिवाय तसेही मागच्यावेळेला तेआमच्या बरोबर होतेच, असेही सूचक भाष्य जगताप यांनी केले. दरम्यान, महापौरपदसव्वा-सव्वा वर्षे वाटपाबाबत आता काही ठरलेले नाही व त्याबाबतही वरिष्ठचनिर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.




--चौकट-


पाचजण इच्छुक




उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीन इच्छुकांचीनावे ठरवली असली तरी आणखी दोन इच्छुकांची नावे माझ्याकडे आहेत, असेआ. जगताप यांनी स्पष्ट केल्याने पक्षाच्या समन्वय समितीने ठरवलेल्या गणेश भोसले,मीना चोपडा व विनित पाऊलबुद्धे या तीन नावांव्यतिरिक्त अन्य दोन नावे कोणतीआहेत, याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. तसेच या पाच इच्छुकांपैकी कोणाचीअंतिम वर्णी लागते, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.


--


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only