Tuesday, June 8, 2021

पुन्हा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलीनगर दिनांक 8 प्रतिनिधी 


आज रोजी शहरास पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी नांदगाव येथे फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे


, आज मंगळवार दिनांक 8 रोजी दुपारी ०४.०० वाजलेच्या सुमारास अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी (७०० एम.एम. सी.आय.) नांदगाव (मनमाड हायवे लगत) गावा समोरील ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचे नविन जलवाहिनी टाकणेच्या चालू असलेल्या कामा करिता पोकलॅन मशिन द्वारे खोदाई सुरू असताना मशिनचा धक्का लागून फुटलेली आहे. सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम अमृत योजनेचे ठेकेदार व महानगरपालिकेने तातडीने हाती घेतलेले असून युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे.


परंतू दुरूस्ती कामास अवधी लागणार असल्याने व दरम्यानच्या काळात सदर जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने आज मंगळवार दि.०८ रोजी नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, व तसेच बुरुडगाव रोड, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास पाणी पुरवठा होउ शकणार नाही. या भागास उद्या दि. ०९ रोजी पाणी वाटप करण्यात येईल.


तसेच बुधवार दि. ०९ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा. मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, सर्जेपुरा, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी इत्यादी ठिकाणी उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.


तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे महानगर पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only