Tuesday, June 8, 2021

जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातून-मुख्य आरोपी बोठेविरुद्ध पुरवणी दोषारोप पत्र आज न्यायालयात दाखल, 26 जणांचे घेतले जबाब नगर दि.८ प्रतिनिधी 

यशस्विनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सात जणांविरुद्ध पारनेर न्यायालयामध्ये पुरवणी दोषारोप पत्र आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली.दरम्यान, हे हत्याकांड जरे व बोठे यांच्यातील प्रेम प्रकरणातून तसेच त्यातून त्यांच्यात होणारी  वादावादी व त्यातुन होणाऱ्या बदनामीची भीती, हे या हत्याकांडचे मूळ कारण असल्याचे हे उघड झाले आहे.रेखा जरे यांच्या  हत्याकाड प्रकरणात पोलिसांनी घटना घडल्यानंतर दोन दिवसांत ज्ञानेश्वर ऊर्फ गुडू शिवाजी शिंदे ( श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (रा. (नगर) या पाचजणांना अटक केली होती. त्यानंतर  तीन महिन्यानंतर बाळ जगन्नाथ बोठे याला अटक केली होती. या घटनेचा मास्टर माईंड पत्रकार बोठे हा या घटनेतील मुख्य आरोपी असून तो घटना झाल्यापासून तीन महिने फरार होता. हैदराबाद येथे तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या शोधासाठी पास विविध पथके पाठवली होती. या पथकाने 12 मार्च रोजी बोठे याच्यासह सात जणांना हैदराबााद येथे अटक केली होती. त्यावेळी  आरोपींमध्ये जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५, रा. गुडुर करीमनगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३०, रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) यांचा त्यामध्ये समावेश होता. या प्रकरणामध्ये संबंधित ही आरोपी महिला अद्याप फरार आहे.याच वेळी नगरमधून महेश तनपुरे यालाही पकडण्यात आले होते.३० नोव्हेंबरला जरे यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी नाव घेतल्यापासून बोठे फरार झाला होता. सुरुवातीला काही काळ देशातील इतर शहरात राहिल्यानंतर त्याने हैदराबाद गाठले. बोठे हा पीएचडी पदवीधारक आहे. ही पीएचडी याच भागात असलेल्या उस्मानिया विद्यापाठातून मिळविलेली आहे. पीएचडी मिळविताना तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना) या वकीलाशी त्याची ओळख झाली. मोठमोठ्या गुन्हेगारांना आश्रय देऊन त्यांना पाहिजे ती मदत मिळवून देण्यासाठी चंद्रप्पा या या भागात कुप्रसिद्ध आहे. चंद्रप्पा याने बोठेला बिलालनगरमध्ये लपवून ठेवले होते.

पोलिसांना बोठेचा ठावठिकाणा समजला होता. परंतु ज्या बिलालनगर भागात बोठे लपून बसला होता, तो भाग गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याने पोलिसांना सहजासहजी तेथपर्यंत पोहोचणे मुश्किल होते. त्यामुळे नगरच्या पोलिसांनी सोलापूर क्राईम ब्रँच, मुंबई क्राईम ब्रँच, महाराष्ट्र पोलिस, सायबर पोलिस तसेच तेलंगणा व हैदराबाद पोलिसांना सोबत घेतले. त्यासाठी मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार लोकेशन काढण्यात आले.

या भागात असलेल्या प्रतिभानगर परिसरात एका हॉटेलवर बोठे हा बी. बी. पाटील या नावाने राहत होता. पोलिसांना या हॉटेलमधील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस त्याठिकाणी गेले. मात्र त्या रुमला बाहेरून कुलूप लावलेले होते. त्यामुळे पोलिसही चक्रावले. हॉटेलमधील कामगारांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला आतमध्ये कोणीही नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्यातील एका कामगाराने पोलिसांच्या भीतीपोटी बोठे हा आतच बसलेला असून, रूमला बाहेरून कुलूप लावले असल्याचे सांगितले. त्यानुसार कुलूप उघडून पोलिसांनी रूममध्ये जात त्याला ताब्यात घेतले होते 


पारनेर येथील न्यायालयामध्ये सुरुवातीला जे पहिले दोषारोपपत्र दाखल केले होते ते 750 पानांचे दोषारोप पत्र दाखल होते. त्यामध्ये सुरुवातीला अटक केलेल्या पाच आरोपींचा समावेश होता. बोठे याला अटक केल्यानंतर आज पारनेर येथील न्यायालयामध्ये सात जणांविरुद्ध दोषारोप पत्र तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामध्ये बोठे याच्याकडून तपासामध्ये जी माहिती मिळालेली आहे त्याचा सर्व उल्लेख करण्यात आलेला आहे. साधारणता 450 पानांचे हे असून यामध्ये 26 जणांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहे. बोठे याने जरे यांना मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे उघड झालेले आहे.


बोठे याने 12 लाख रुपये देऊन हे हत्याकांड केले आहे .बोठे याने यातील आरोपी भिंगारदिवे याला जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये भिंगारदिवेला दिले,  भिंगारदिवे याने ते पैसे त्याच्या घरी नेले व त्यानंतर या घटनेतील आरोपी चोळके याला ठरल्याप्रमाणे त्याचे साडेतीन लाख रुपये दिले व भिंगारदिवे हा त्यानंतर उरलेल्या पैशा

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only