Monday, June 28, 2021

आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ




नगर दिनांक 27 प्रतिनिधी 


बँक ऑफ महाराष्ट्रा च्या 98 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रसाद गुंड याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


बँक ऑफ महाराष्ट्र चा 98 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणात संदर्भामध्ये येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथून आरोपी प्रसाद गुंड याला मोठ्या शिताफीने पकडले होते. या घटनेमध्ये त्याचा साथीदार अमोल गाडेकर हा मात्र फरार आहे.


98 लाख रुपयांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून  गुंड याने घेतलेले होते, सदर कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेची फसवणूक झाल्याचे बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हा हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तीन वर्षानंतर येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या पथकाने विविध  ठिकाणी तपास सुरू केल्यानंतर आरोपी हा दिल्ली येथे आढळून आला व त्याला मोठ्या शिताफीने त्याला पकडले होते ,त्यानंतर त्याला दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी  होती.


 दरम्यान गुंड याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर या घटनेचा तपास पोलिसांना करायचा आहे, त्याने कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केलेले आहेत याचा सुद्धा ठावठिकाण लावायचे आहे.  गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिनांक 30 तारखे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.


दरम्यान आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ,सातारा या ठिकाणी छापे टाकले, मात्र फरार असलेला गाडेकर हा कुठे आढळून आलेला नाही. त्याचा शोध आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घेत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only