Tuesday, June 1, 2021

माणिक चौक येथील 96 वर्षीय जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला.अहमदनगर – गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह धुवॉंधार कोसळल्या पावसाने  माणिक चौक येथील 96 वर्षीय जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला. त्यामुळे इमारतीलगत असलेल्या दोन दुकांनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. मंगळवारी(दि.1)  पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहनी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


गेल्या दोन दिवसापासून नगर शहरात पावसाची बॅटिंग सुरू आहे. काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसाने शहर व परिसराला अक्षरश झोडपून काढले.  नगर शहरातील  चितळे रोड, माळीवाडा, दिल्लीगेट, कापडबाजर, सावेडी, पाईपलाईन रोड, सावेडी,  भिगार, केडगाव भागात पावसाच्या चांगल्याच सरी बरसला. या पावसामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न चागलाच ऐरणीवर आला आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only