Tuesday, June 8, 2021

सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरला


नगर दि  9

प्रतिनिधी

घरामध्ये झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवास प्रवेश करून सुमारे एक लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील बागरोजा हडको परिसरामध्ये घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे


 विनोद छगनराव काकडे वय ४३ वर्ष धंदा सिव्हील इंजिनिअर रा. रेणाविकर कॉलनी, साताळकर हॉस्पिटल शेजारी बागरोजा हाकडो, यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे, 


यासंदर्भात दिलेल्या प्रगतीमध्ये काकडे यांनी म्हटले आहे की मी बागरोजा हडको ठिकाणी आई- दीपदाबाई पत्नी स्वाती मुलगा अभिषेक असे एकत्र राहत असुन मी सिव्हील इंजिनिअर म्हणून काम करून माझ्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो.   माझे दु मजली घर आहे. दिनांक ०७ रोजी रात्री १०/३० वाचे सुमा आमचे घरातील सर्व लोकांचे जेवण झाले होते.


त्यामुळे मी माझी पत्नी स्वाती व मुलगा अभिषेक असे आमचे घराचे वरच्या मजल्यावर माझ्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होतो व खाली मजल्यावर असलेले हॉल मध्ये माझी आई दीपदाबाई एकटी झोपली होती मुलगा अभिषेक याची तबीयत खराब होती त्यामुळे आम्ही ११ वा झोपी गेलो त्यानंतर दिनांक ०८ रोजी ०४/४५ वाचे सुमा मुलगा अभिषेक यास ताप असल्याने त्यास औषध देण्या करीता मी बेडरूम मधुन खाली किचन मध्ये पाणी आण्यासाठी गेलो असता हॉल मध्ये माझी आई झोपलेली होती तसेच मी किचन मध्ये गेलो असता माझे घरचे मागील बाजूस असलेला बाहेर जाण्याचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा त्याच वेळी दिसले की, मागील बाजूस ठेवलेले लोखंडी कपाटाचे दारवाजे उघडे आहेत व त्यामधील समान अस्थव्यस्थ खाली पडलेले होते तेव्हा माझ्या लक्षात आले की, लक्षात आले की, मागील दरवाजातून कोणीतरी आत प्रवेश करून सामानाची उचकापाच केली आहे तेव्हा मला समजले की, आईने चुकुन मागील बाजुचा दरवाजा बंद केला नव्हता त्यानंतर मी बेडरूम मध्ये जावून पत्नीस उठवून तीस झालेला प्रकार सांगितला व आम्ही दोघे खाली किचन मध्ये येवून पाहणी केली असता मागील अंगणातील रूम मधील लोखंडी कपाट व किचन मध्ये ठेवले लाकडी कपाट उघडे दिसले व त्याची उचकापाचकी केलेली दिसली तेव्हा आम्ही दोन्ही कपाटाची पाहणी केली असता किचन मधील लाकडी कपाटाचे ड्रॅवर मध्ये ठेवलेले खालील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे यामध्ये ८७,०००/- रू किची सोन्याची गळयाती चैन ,  १२,०००/- रू किची सोन्याची अंगठी  कि, ३८,०००/- रू रोख रक्कम त्यामध्ये विविध दराचे नोटा असा एकूण १,३७,०००/- रू ऐवज चोरीला गेला


या संदर्भामध्ये तोफखाना पोलिसांची संपर्क केला असता पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only