Sunday, June 27, 2021

धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून चोरटे झाले पसार
नगर दिनांक 27 प्रतिनिधी


ब्युटी पार्लरचे काम आटोपून घरी जात असताना दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात चोरांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सुमारे 57 हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना आज भरदुपारी घडल्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सविता गणेश शेलार (वय ४१) यांनी याबाबत तोफखाना ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


आज २७ रोजी दुपारी ०३:३० वा. सुमारास शेलार या गुलमोहर रोड परिसरात गेल्या होत्या. पार्लरचे काम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना बी एस.एन.एल. कार्यालयासमोर  कलानगर येथे पोहचले असता पाठीमागून एका काळया रंगाचे मोटरसायकल वरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओढून नेले. चोरटे हे मोटरसायकलवर रामकृष्ण कॉलनीच्या दिशेने जोरात निघून गेले. चोरट्याने तोंडाला मास्क लावले होते. तसेच सदर इसमाने टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स घातली होती.


५७,०००/- रु. कि. एक सोन्याचे १९ ग्रॅम १२० मिली वजनाचे गंठण चोरून नेल्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only