Tuesday, June 8, 2021

पळून चल नाहीतर आत्महत्या करेल; अल्पवयीन मुलीला दिली धमकीपळून चल नाहीतर आत्महत्या करेल; अल्पवयीन मुलीला दिली धमकी


नगर -दि 8 प्रतिनिधी

माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मी आत्मत्या करेल असे म्हणत अल्पवयीन तरूणीला धमकी दिल्याप्रकरणी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सावेडी उपनगरात हा प्रकार घडला असून फिर्याद दाखल करणारी तरूणी अल्पवयीन आहे. 


प्रकाश रावसाहेब उमाप (वय 20, रा. नालेगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे.जानेवारी 2021 ते 7 जून च्या कालावधीत माझ्याशी प्रेसंबंध ठेव अशी वारंवार मागणी आरोपी प्रकाश उमाप हा पिडीत तरूणीकडे करत होता. पिडीतेने उमाप याला नकार दिला असता त्याने पिडीतेच्या घराजवळ येवून गाडीचा हॉर्न व शिट्टी वाजवून तसेच तिचा पाठलाग करून मानसिक त्रास दिला. आरोपी उमाप याच्या त्रासाला कंटाळून पिडीत तरूणीनी तिच्या काकांच्या घरी गेली असता आरोपी उमाप तिच्या काकांच्या फोनवर फोन करून माझ्यासोबत पळून चल अन्यथा मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. तसेच पिडीत तरूणीच्या भावाला आरोपी उमाप याने दिल्लीगेट याठिकाणी बोलावून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली आहे.


यासंदर्भात पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि. कलम 354, 354(ड), 504, 506 बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. 2012 कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भानसी करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only