Wednesday, June 30, 2021

महानगरपालिकेने ऑक्सिजनचा साठा जास्तीत जास्त करण्यासाठी तयारी करावी जिल्हाधिकारी भोसलेमहानगरपालिकेने ऑक्सिजनचा साठा जास्तीत जास्त करण्यासाठी तयारी करावी जिल्हाधिकारी भोसले

नगर दिनांक 30 प्रतिनिधी


नगरच्या महानगरपालिकेने कशा पद्धतीने  जास्तीत जास्त ऑक्सिजन चा साठा उपलब्ध करून ठेवता येईल या दृष्टिकोनातून पावले उचलली पाहिजे, तिसरी लाट् येईल या साठी सुद्धा महानगरपालिकेच्य ज्या काही उपाययोजना करता येतील, त्या तात्काळ कराव्यात अशा प्रकारची चर्चा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 9 नऊ लाख जणांना डोस देण्यात आले  असल्याचे त्यांनी सांगितले, नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत डेल्टा प्लस चा रुग्ण आढळून आलेला नाही, असे ते म्हणाले. 


आज महानगरपालिकेमध्ये महापौर, उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले बोलत होते. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे आदी या वेळी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले म्हणाले की ,नगर जिल्ह्याला तीनशे मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. आत्तापर्यंत सव्वादोनशे मेट्रिक टन ऑक्सिजन हा आपल्याकडे आहे. नगर शहरामध्ये साधारणता 125 मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे. तिसरा लाटेची शक्यता असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .महानगरपालिकेने सुद्धा औषधांचा साठा जास्तीत जास्त कशा पद्धतीने ठेवता येईल या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे, तसेच ऑक्सिजनच्या साठा सुद्धा कशा पद्धतीने वाढवता येईल या करिता आज पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेमध्ये तशा सूचनाही त्यांना आम्ही दिल्या आहे, येथील प्रशासनाने हिवरेबाजार पॅटर्न राबविला होता. त्याचा पॅटर्न आपण नगर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये राबवता येईल का या पद्धतीने सुद्धा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे असेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.


नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 9 लाख लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण व शहरी भागाचाही समावेश आहे .जशा जशा लस उपलब्ध होतात तशा तशा पद्धतीने त्याचे वितरण केले जाते असेही त्यांनी सांगितले. डेल्टा प्लस चा आतापर्यंत एकही रुग्ण नगर जिल्ह्यामध्ये आढळून आलेला नाही असेही त्यांनी सांगितले.


यावेळी महापौर शेंडगे यांनी दुपारी चार नंतर सर्व व्यवहार बंद होत असताना दुपारी दोन नंतर मोठी गर्दी बाजारपेठेमध्ये निर्माण होती. त्यासंदर्भात सुद्धा विचार केला पाहिजे असे त्या म्हणाल्या,

 तर उपमहापौर भोसले यांनी शहरांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून द्या शी मागणी  भोसले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only