Thursday, June 3, 2021

डॉ. शेळकेंविरोधातील गुन्ह्यासह 24 आर्थिक प्रकरणांचा तपास पूर्ण पोलिसांनी सुरू केली दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रियाडॉ. शेळकेंविरोधातील गुन्ह्यासह 


24 आर्थिक प्रकरणांचा तपास पूर्ण

पोलिसांनी सुरू केली दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया


अहमदनगर/प्रतिनिधी- नगरमधील बहुचर्चित व्यक्तिमत्व डॉ. नीलेशशेळकेच्याविरोधात शहर सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल केलेल्यागुन्ह्यासह अन्य 23 आर्थिक गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असून, या सर्वप्रकरणांची दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातीलडॉ. शेळकेंविरोधातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेव आता अन्य दोषारोपपत्रे टप्प्या टप्प्याने न्यायालयात दाखल होणार आहेत.
नगर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडले असून,यापैकी काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे जेथे घडले, त्याक्षेत्रातील पोलिस ठाण्यांतून हे गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांचा तपास पोलिसअधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे व हा तपास पूर्ण झाल्यावरत्यांचे दोषारोप पत्र तयार करून संबंधित पोलिस ठाण्याद्वारे न्यायालयात दाखलकरण्याचे काम सुरू केले आहे.
डॉ. शेळकेविरोधात तीन दोषारोपपत्रे
नगरमधील शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी डॉ.नीलेश विश्‍वास शेळकेविरोधात तीन गुन्हे दाखल असून, त्यांचा तपास पूर्ण झाल्याने आताया तीन गुन्ह्यांचे स्वतंत्र दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठीअहमदनगर शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटपकेल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचेतीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेेत. राहुरी येथील डॉ.रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधीलडॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी फिर्याद नोंदवली असून, बनावटकागदपत्रांद्वारे या तिघांची प्रत्येकी 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झालीअसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासीअधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी केला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only