Tuesday, June 15, 2021

मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून झाडल्या चार गोळ्या... पण...चांदा | वार्ताहर


नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रोडने रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या इसमांनी  गावठी कट्टयातून संकेत याच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे . चांदयातील घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच बऱ्हाणपूर येथे झालेल्या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only