Tuesday, June 8, 2021

अत्याचार झालेल्या युवतीने संपविले जीवन नगरच्या 'या' भागात घडली घटनानगर दिनांक 8 प्रतिनिधीअत्याचार झालेल्या युवतीने मानसिक त्रासातून स्वत: चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बोल्हेगाव परिसरात घडली. दरम्यान याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकारामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बोल्हेगाव परिसरात 17 वर्षीय युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात इसमाने अत्याचार केला यामुळे सदर युवती गर्भवती राहिली. सदरची बाब ही तिच्या आई वडिलांना कळालेली होती त्यानंतर त्यांनी त्या मुलीला घेऊन रुग्णालयांमध्ये सुद्धा गेले होत प्राथमिक स्तरावर तिला काही औषधे देण्यात आले असल्याचेही समोर आले आहे आपल्यावर अत्याचार झालेल्या युवतीला आपण गर्भवती राहिल्याचा धक्का बसला. या मानसिक त्रासातून तीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले.


या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो), आत्महत्येस प्रवृत्त करणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस मुंडे हे करत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only