Saturday, June 5, 2021

सोमवार पासून नगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू पालकमंत्र्यांची घोषणानगर दि 5 प्रतिनिधी


राज्य शासनाने दिलेल्या निकषानुसार नगर जिल्ह्यामध्ये कोरोना चे रुग्ण कमी झाल्यामुळे सोमवारपासून नगर जिल्ह्यामध्ये सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली, दरम्यान केंद्र सरकारने लसीकरण  संदर्भामध्ये सगळ्यांचे पालकत्व स्वीकारायला पाहिजे असे सांगून अमेरिकेने आपल्याला लस देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे राष्ट्राध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे आपण आभारी आहोत , येथील लस तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांनाच केंद्राने दमबाजी केल्यामुळे ते आता आपला देश सोडून परदेशात गेले आहे हीसुद्धा वस्तुस्थिती आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.


नगर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी , आमदार संग्राम जगताप, , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे,  आदी यावेळी उपस्थित होते.


पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये आपण उपाय योजना केलेल्या होत्या तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे त्याची तयारी सुद्धा प्रशासनाने सुरू केलेले आहे आपल्याकडे कोणत्याही प्रकारे औषधाचा साठा उपलब्ध नाही असे नाही सर्व औषधे आपल्याकडे आहेत तसेच ऑक्सिजनचे बेड सुद्धा आपल्याकडे आहे. आता लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचारासाठी केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या ही कमी झाल्यामुळे शासनाने दिलेल्या निकषानुसार आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये आलो आहोत त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले सात दिवसांमध्ये आम्ही पुन्हा आढावा घेणार आहोत जर परिस्थिती तशीच राहिली तर आपल्याला पुन्हा मागे जावे लागणार आहे, त्यामुळे जे काही शासनाने नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहनही पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.


तिसऱ्या लाटे च्या अगोदर आपले लसीकरण पूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेने 80 टक्के लसीकरण पूर्णत्वाला गेले पाहिजे असे सांगितले आहे तसेच आपल्या देशात सुद्धा ते झाले पाहिजे राज्याचे झाले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगून आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये सात लाख 15 हजार 142 जणांना लसीचा डोस दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले .आज लस उपलब्ध होत नाही त्यामुळे अडचणी निर्माण झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये ज्या वेळेला निवडणुका सुरू होत्या त्या वेळेला त्यांनी त्यावेळचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला पण आता तेथे सत्ता बदल झालेला आहे जो बाय डन हे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत व हिंदुस्तानच्या असलेल्या कमला हॅरीस या उपाध्यक्षा झालेल्या आहेत त्यांनी हिंदुस्थानला 250000000 डोस देण्याची तयारी दर्शविली आहे त्यामुळे आपण त्यांचे आभार मानले असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. आपल्या देशामध्ये ज्या दोन कंपन्या लस देत होत्या केंद्राने त्यांना धमकी दिल्यामुळे ते आपला देश सोडून आता परदेशात राहिला गेलेले आहेत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.लसीचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला ते सर्वांना देता येत नाही पण नगर जिल्ह्यामध्ये लसीकरणाबाबत जर सावळागोंधळ निर्माण झाला असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल जर माझ्याकडे तशी तक्रार आली तर आम्ही सर्व प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी करू असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


तिसरा लाटेमध्ये लहान मुलांना धोका आहे असे सांगितले आहे त्यामुळे त्याची तयारी सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या त्यामध्ये लहान मुलांना सुद्धा याची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे आठ हजार 896 यामध्ये आढळून आलेल्या आहेत त्या वेळात दोन जणांचा मृत्यू सुद्धा त्यामध्ये झाला होता पण आता सर्वजण बरे आहेत पण कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका तिच्या लाटेची तयारी आपल्याला करायची आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क रहावे ऑक्सिजन बेड तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देश सुद्धा दिले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.चौकट


नगर जिल्ह्यामध्ये लसीकरण करताना अनेक धक्कादायक गोष्टी या उजेडात आलेल्या आहेत सगळा सावळा गोंधळ आरोग्य केंद्रावर निर्माण झालेला आहे असे असताना या संदर्भामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लसीकरणाच्या गोंधळाबद्दल विचारले असता माझ्याकडे कोणाची एकाची तक्रार आलेली नाही जर तक्रार आली तर निश्चितपणे

  1. आपण नगर साठी काय नाहीं केलं फक्त 2 वेळा आले बस
    आमचं नशीब खराब अस पालकमंत्री बेटला 😐👏

    ReplyDelete

Whatsapp Button works on Mobile Device only