Tuesday, June 15, 2021

हनी ट्रॅप : आरोपींना 18 जून पर्यंत पोलीस कोठडीहनी ट्रॅप : आरोपींना 18 जून पर्यंत पोलीस कोठडी


नगर दि 15 प्रतिनिधी


नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणांमध्ये पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.


नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणामध्ये संबंधित महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांना अटक केली होती.


 पहिल्या गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर सात दिवसांचा कॉरंटाईन  पिरेड संपल्यानंतर त्यांना दुसऱ्या दाखल असलेल्या नगर तालुक्यातील तीन कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणांमध्ये या दोघांना वर्ग करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले केल्या असता त्यांना दि. 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नगर तालुक्यातील प्रकरण हे गेल्या महिन्याभरापासून चांगले चर्चेचे झाले आहे. पहिल्या घटनेमध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वरील दोन आरोपींना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. त्याचा तपास सुरू असतानाच नगर तालुक्यामध्ये दुसरा गुन्हा या आरोपींच्या विरोधामध्ये 3 कोटी रुपयांचा दाखल झालेला होता. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना त्यांच्यासमवेत अटक केली होती. या घटनेमध्ये संबंधित महिला व अमोल मोरे हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांचा तपास पोलिसांना करायचा आहे तसेच त्याचे अजून कोण कोण साथीदार आहेत याचा सुद्धा तपास दुसऱ्या गुन्ह्यात करायचा आहे तसेच या दोघांचे संभाषण तसेच त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे ते पुढील तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only