Wednesday, June 9, 2021

हनीट्रॅप प्रकरणासंदर्भात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल हनीट्रॅप प्रकरणासंदर्भात दोषारोपपत्र न्यायालयात दाखलनगर दिनांक 9 प्रतिनिधी


 नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनिट्रॅप प्रकरणी दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या विरोधात आज येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली,


 आरोपींमध्ये संबंधित महिला, अमोल मोरे राहणार नगर ,बापू सोनवणे राहणार हिंगणगाव तालुका नगर यांचा समावेश आहे


मागील महिन्यामध्ये नगर तालुक्यातील जखणगाव येथे सदर प्रकरण उजेडात आले होते, येथील एका महिलेने एका व्यापाऱ्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, या बदल्यांमध्ये त्यांनी पाच लाख रुपये संबंधिताला  दिल्यानंतर संबंधित महिला व नगर येथे राहणारा अमोल मोरे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता.


नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणामध्ये संबंधित महिला व अमोल मोरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 मोबाइल यासह रोकड  हस्तगत केलेली होती, या घटनेच्या तपासामध्ये नगर तालुक्यातील बापू सोनवणे या व्यक्तीचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर काही दिवसानंतर पोलिसांनी बापू सोनवणेला अटक केली होती, एक कोटी रुपयांचा खंडणी प्रकरणाचा विषय हा त्यावेळेला चांगलाच गाजला होता, संबंधित फिर्यादीची सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या तसेच 84 हजार तीनशे रुपये रोख असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतलेला होता, या घटनेचा तपास सुरू असतानाच नगर तालुका पोलिस ठाण्यांमध्ये हनीट्रॅपचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे, एका प्रथम श्रेणी वर्गातल्या अधिकाऱ्याला 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलेला होता, याच व्यक्तींनी खंडणी मागितल्या आहेत, त्यावेळी निष्पन्न झाले होते,


नगर तालुक्यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये संबंधित आरोपी महिला,  बापू सोनवणे, अमोल मोरे यांच्या विरोधामध्ये आज येथील न्यायालयांमध्ये 82 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे, या दोषारोप पत्रामध्ये महत्त्वाचे सर्व तपासाची मुद्दे देण्यात आलेले आहेत, त्यांनी खंडणी कशा पद्धतीने मागितली, तीन कोटी च्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे तसेच त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा यामध्ये आलेले आहे, त्याचे सुद्धा पुरावे या दोषारोप पत्र मध्ये जोडण्यात आलेले आहेत तसेच मोरे व अन्य दोन जणांचे मोबाईल हस्तगत केल्यानंतर ते फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवलेले आहेत, त्याचा तपास अद्याप होऊ शकलेला नाही, आज न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर यामध्ये पहिल्या गुन्हयाचे हे दोषारोपपत्र असून हेच आरोपी दुसऱ्या गुन्हा मध्ये असल्यामुळे आता  त्या घटनेचा तपास झाल्यानंतर दुसरे दोषारोप पत्र दाखल होणार आहे,

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only