Thursday, June 10, 2021

औरंगाबाद येथुन 6 वर्षाच्या मुलाला किडनॅप करणा-या आरोपीला 12 तासात श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरबंद.औरंगाबाद येथुन 6 वर्षाच्या मुलाला किडनॅप करणा-या आरोपीला 12 तासात श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरबंद.


दि.09 जून रोजी औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे परशुराम नवनाथ रासकर वय 36 वर्ष, यांचे नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना माहीती दिली की, परशुराम रासकर यांचा सहा वर्षाचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर रा. श्रीगोंदा याने परशुराम रासकर याची पत्नी हीचेसोबत प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवून नेईल असे म्हणून अभिनव यास त्याचे कडील स्विफ्ट डिझायर गाडी नं.एम.एच.42 ए.एच.9655 मध्ये किडनॅप करुन श्रीगोंद्याकडे येत आहे. थोड्याच वेळापूर्वी अहमदनगर कायनेटिक चौकातुन दौंड रोडने गेला आहे अशी माहीती मिळाली.


 त्यावरुन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौंड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवून तात्काळ रवाना केले. नाकाबंदी दरम्यान सायंकाळी 06 वा. चे. सुमारास मिळालेल्या माहीती मधील स्विफूट डीझायर गाडी क्रमांक एम.एच.42 ए.एच.9655 ही अहमदनगर कडुन दौड कडे जाताना दिसल्याने ती थांबवून त्यातून आरोपी सागर गोरख आळेकर वय 27 वर्षे,रा.आळेकरमळा, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा यास त्याने पळवून आणलेल्या 06 वर्षांच्या अभिनव रासकर सह ताब्यात घेतले. मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. आरोपीस पुढील कारवाईसाठी फिर्यादी परशुराम रासकर यांचे फिर्यादीवरुन एम. आय. डी. सी. वाळुंज, औरंगाबाद शहर पोस्टे गु.रजि. नं. 651/2021 भा.द.वि.क.363 प्रमाणे दाखल गुन्ह्यात एम.आय.डी.सी. वाळुंज, औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.


सदरची कारवाई .पोलीस अधिक्षक  मनोज पाटील ,  अप्पर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव , यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  रामराव ढिकले सपोनि दिलीप तेजनकर, चालक सफो रमेश जाधव, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोका प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकों गोकुळ इंगवले, यांनी केली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only