Sunday, June 20, 2021

गहू व तांदूळ काळाबाजार प्रकरणात संदर्भात आठ आरोपींना, अटक दोन जण फरार, आरोपींना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी नगर दि 20 प्रतिनिधी 


नगर शहरामध्ये रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीला नेत असल्या प्रकरनात  आत्तापर्यंत पोलिसांनी आठ जणांना याप्रकरणी अटक केली असून यामध्ये दोन जण फरार आहे. आहे, अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 24 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश श्रीनिवास झंवर ,जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, सुभाष पागिरे, सागर अशोक नांगरे, सुरेश रासकर, भगवान छत्तीसे, आदिनाथ चव्हाण, यांना अटक केली असून या प्रकरणांमध्ये संग्राम रासकर, आसाराम रासकर हे दोघे जण फरार आहे.


नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात काल कोतवाली व जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रासकर यांच्या दुकान व गोदामवर छापा करून 42 लाख रुपयांचा काळ्याबाजारात जाणारा रेशनचा गहू व तांदूळ हा जप्त केला आहे. तसेच चार चाकी गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त करून मार्केटयार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व केडगाव इंडस्ट्रीज मध्ये असणाऱ्या गोडाऊनला पोलिसांनी सील ठोकले आहे.


लॉक डाऊन च्या काळात जे गहू व तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे  मार्केट यार्ड परिसरामध्ये सुरेश रासकर यांचे सुरज ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडिंग कंपनी या नावाची फर्म आहे ते तर यांचे धान्य ठेवण्यासाठी चे गोडाऊन हे केडगाव इंडस्ट्रीज मध्ये आहे. सदर ठिकाणी काळा बाजार होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर काल त्यांनी रासकर यांच्या दुकानावर व गोडाऊन वर छापा टाकून 42 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला आहे. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.


 कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड येथे घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात मध्ये वेगळा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहा आरोपी आहे तर केडगाव येथे गोदामासंदर्भात दुसरा गुन्हा स्वतंत्र असा दाखल केला असून त्यामध्ये चार आरोपी आहे एकूण या प्रकरणांमध्ये दहा आरोपी असून आज व काल पोलिसांनी आठ जणांना अटक केली. या प्रकरणांमध्ये दोन जण अद्यापही फरार आहे.


पकडलेल्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता रासकर यांच्याकडे सापडलेल्या गहू व तांदूळ यांच्या गोण्याची तपासणीत पोलिसांना करायची आहे . मध्यप्रदेश, हरियाणा या ठिकाणाहून ज्यांनी हा माल आणला असल्याचे सांगितले आहे तो नेमका त्याच्याकडून आणला आहे का याची सुद्धा खातरजमा करायची आहे. तसेच माल कुठून कसा आणला व कोणाला विकला गेला याचा सुद्धा पोलिसांना तपास करायचा आहे , या प्रकरणांमध्ये अन्य कोणाकोणाचा समावेश आहे याची सुद्धा पोलिसांना माहिती द्यायची आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी  असल्यामुळे यांच्याकडे असणारे बिल बुक तसेच यांची रोजमेळ ची वही हेसुद्धा पोलिसांना हस्तगत करायची आहे , संगणकावर असलेल्या नोंदणी या केल्या आहेत की नाहीत याचा सुगावा पोलिसांना छडा लावायचा आहे. त्यामुळे आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयांमध्ये करण्यात आला, न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या आठ आरोपींना दिनांक 24 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


दरम्यान काल पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक रेशन दुकानदारांचे धाबे जाणाऱ्या असून रेसिंगचा माल  हा योग्य पद्धतीने वितरित होतो की नाही याबाबत सुद्धा आता भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांच्या रडावर अजून कोण कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only