Thursday, June 24, 2021

रेशनिंगच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी संग्राम रासकर याला कोतवाली पोलिसांनी केली अटकरेशनिंगच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी संग्राम रासकर याला कोतवाली पोलिसांनी केली अटकनगर दि 25 प्रतिनिधी 


शहरातील मार्केट परिसरांमधून रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्याबाजारात विक्रीला गेल्या प्रकरणांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संग्राम रासकर याला काल कोतवालीच्या पोलिसांच्या पथकाने भिंगार येथे मोठ्या शिताफीने पकडले आहे. दरम्यान या घटनेतील अन्य एक आरोपी फरार असून अनेकांचे जबाब पोलिसांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे.


मागील आठवड्यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्केटयार्ड परिसरामध्ये रासकर यांच्या कार्यालयावर व केडगाव येथील गोदामावर छापा टाकून सुमारे 42 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलेला होता. रासकर यांनी रेशनिंगचा आलेला गहू व तांदूळ हा सर्रास पणे विक्रीला आणले ठिकाणी पाठवल्याचे उघड झालेले होते, पोलिसांनी पहिल्या दिवशी दोन वेगवेगळे गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेले होते या प्रकरणांमध्ये एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये दोन जण फरार होते त्यातील संग्राम रासकर हा यातील मुख्य आरोपी आहे.


संग्राम याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी तपासणी केली, संग्राम हा नगर शहरामध्ये राहत असून तो येथील व्यापाऱ्यांच्या   संपर्कात असल्याचे पुरावे कोतवाली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी काल रासकर याचे शोधासाठी भिंगार येथे पथक पाठवले होते मोठ्या शिताफीने त्याला भिंगार येथून अटक केली व त्याच्या कडून मोबाईल हस्तगत केलेला आहे विशेष म्हणजे सदर चा मोबाईल हा त्याचा  नसुन दुसऱ्यांचा मोबाईल वापरून तो व्यापाऱ्यांची व इतरांशी संपर्क करत असल्याचे उघड झाले आहे.


सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कचरे, सुमित गवळी, शाहीर शेख ,बंडू भागवत सोमनाथ राऊत, यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.


दरम्यान या प्रकरणातील आरोपी संग्राम रासकर याला अटक केल्यानंतर त्याच्या कडून माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, दुसरी इकडे या प्रकरणांमध्ये फरार असलेले त्याचे वडील आसाराम रासकर यांचा तपास लागलेला नाही या दोघांवर याअगोदर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर आता पुढील कारवाईचा प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी दिली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only