Saturday, June 12, 2021

विवाहित महिलेचा विनयभंग कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपतीला मारहाण करत विवाहित महिलेचा विनयभंग 


कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


अहमदनगर - सक्कर चौक येथे एका विवाहित महिलेसह तिच्या पतीला मारहाण करत  महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पिडीत महिलेने पोलीसात फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र वामन सोनार, संजय वामन सोनार याच्यासह दोन अनोळखी इसमाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , फिर्यादी व आरोपी याचे कोर्टात जागेवरून वाद आहे. काल रात्री फिर्यादी त्याचे गोडाऊन पाहण्यासाठी पतीसह गेल्या होत्या. त्यावेळी गोडाऊन जवळ आवाज झाला. ते पाहत असताना आरोपी व काही इसम हे भित पाडत असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली. कोर्टात केस सुरू असुन हे करणे चुकीचे असल्याचे फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. याचा राग येऊन फिर्यादी व तिच्या पतीला लाथ बुक्क्यानी मारहन करत महिलेचा विनयभंग केल्याचे तकरित म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only