Tuesday, June 15, 2021

दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड कोतवाली पोलिसांची कारवाई । चौघांना गुरूवारपर्यत पोलिस कोठडी दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड


कोतवाली पोलिसांची कारवाई । चौघांना गुरूवारपर्यत पोलिस कोठडी


अहमदनगर -


नगर शहरातील केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपींना गुरूवारपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात पोकॉ. मोरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि. कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर असे की, केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. सोनू उर्फ रूपेश सुधाकर भालेराव (वय 21), रोहन सतिष शिंदे (वय 21), कुणाल सुधाकर भालेराव (वय 19, तीघेही राहणार पंचशिलनगर, रेल्वेस्टेशन रोड, अहमदनगर) आणि अनुज सुधाकर उजागरे (वय 22, रा. ताराबाग कॉलनी, केडगाव) तसेच दोन अल्पवयीन बालके अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सोनू भालेराव, रोहन शिंदे, कुणाल भालेराव आणि अनूज उजागरे यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना गुरूवार दि. 17 जून पर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


आरोपींकडून दोन दुचाक्या, लोखंडी धारदार सत्तुर, लोखंडी गज आणि मिरची पुड असा 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणदिवे हे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only