Wednesday, June 16, 2021

डोक्यात दगड घालून खून करणारा आरोपी 1 तासात जेरबंद ; एलसीबीच्या कारवाई



डोक्यात दगड घालून खून करणारा आरोपी 1 तासात जेरबंद ; एलसीबीच्या कारवाई 


नगर : डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला 1 तासाच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा . लोंढेवस्ती नालेगांव असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 


याबाबत पोलिसानी दिलेली महिती अशी की, काल बुधवार दि . १६/६/२०२१ रोजी फिर्यादी नामे . राहूल दिलीप विरदकर रा . टाणगमळा याने कोतवाली पोलीस फिर्याद दिली होती.  माझे वडील नामे दिलीप देवराम विरदकर रा . ठाणगे मळा , काल सायंकाळी 6.30 दरम्यान दरम्यान नगर - कल्याण रोड , अमरधामच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाच्या खाली शेडमध्ये इसम नामे मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा . लोंढेवस्ती नालेगांव , यास दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी जाणार या कारणावरुन आरोपी याने माझ्या वडीलांना लाकडी दांडक्याने व डोक्यामध्ये दगड घालून जिव ठार मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


 गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि श्री . अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर हे त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार सपोनि सोमनथ दिवटे , पोहेकॉ संदीप घोडके , पोना / संदीप पवार , शंकर चौधरी , रवि सोनटक्के , लक्ष्मण खोकले , पोका संदीप चव्हाण , कमलेश पाथरुट , योगेश सातपुते , सागर सुलाने असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके साो . यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , सदर गुन्हयातील आरोपी नामे मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा . लोंढेवस्ती नालेगांव , अहमदनगर हा गणेश नगर . नेप्ती नाका परिसर आला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नाम मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिंज्जा वय २७ वर्षे रा . लोंढेवस्ती नालेगांव , अहमदनगर यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या अनुशगाने विचारपूस केली असता त्यानी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीयास पुढील कार्यवाहीसाटी कोतवाली पोस्टेला हजर केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only