Friday, June 18, 2021

सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाळत ठेवून पाठलाग करुन व वाहन अडवून लुटमार


करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


दिनांक २८/०५/२०२१ रोजी रात्रीचे वेळी फिर्यादी अन्सार हसन पठाण, वय २६ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. माणिक दौंडी, ता. पाथर्डी हे आयशर टेम्पो नं. एमएच १४ डीएम ०८०० यामध्ये चिखलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद येथून विदेशी दारुचे बॉक्स भरुन क्लिनर अमोल काळे याचेसह औरंगाबाद-नगर रोडने कोल्हापूरकडे जात असताना रात्री ११/३० वा. चे सुमारास ईमामपूर घाट येथे आले असता पाठीमागून कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीचे टेम्पोला कार आडवी लावून टेम्पो अडवून फिर्यादी व त्यांचा क्लिनर यांना गाडीचे खाली ओढून मारहाण करुन व छन्ऱ्याचे बंदूकीचा धाक दाखवून फिर्यादीचा टेम्पो, त्यामधील दारुचे बॉक्स व साक्षीदार अमोल काळे यांचा मोबाईल असा एकूण १०,३०,७९१ /- रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.


त्यानंतर फिर्यादी यांनी सदर घटनेबाबत नियंत्रण कक्ष, अहमदनगर येथे १०० नंबरवर फोन करुन घटनेची माहिती दिली व चोरीस गेलेल्या टेम्पोस असलेल्या जीपीएस प्रणालीवरुन टेम्पोचे लोकेशन घेतले असता सदर टेम्पो हा नगर-मनमाड रोडने मनमाडचे दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी व पोलीसांनी सदर टेम्पोचा पाठलाग केला असता आरोपी हे चिंचोली फाटा येथे दारुसह टेम्पो सोडून पळून गेले होते. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी एमआयडीसी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३५३ / २०२१ भादवि कलम ३९४, ३४९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, वरील नमुद गुन्हा हा स्वप्नील गोसावी, रा. सिन्नर, जि. नाशिक याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, पोकों/शिवाजी ढाकणे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून तसेच तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १) स्वप्नील उर्फ भुषण सुनिल गोसावी, वय २१ वर्षे, मूळ रा. ऐश्वर्या देवी मंदीराजवळ, देवी रोड, सिन्नर, जि. नाशिक, ह.रा. नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक यांस नामपूर येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार संतोष खरात, गणेश कापसे, भारत सुतार अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) संतोष उर्फ बापू पंडीत खरात, वय २१ वर्षे, रा. नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक, ३) कुलदिप उर्फ गणेश मनोहर कापसे, वय - ३८ वर्षे, रा. अश्वमेघ कॉलनी, आरटीओ ऑफिसजवळ, नाशिक, ४) भारत सिताराम सुतार, वय - ३६ वर्षे, रा. टाऊनशिप, आंबेडकर नगर, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.


वरील नमुद ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील साक्षीदार अमोल काळे यांचा चोरलेला १०,०००/- रु. रियल मी कंपणीचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only