Saturday, June 19, 2021

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मोटारसायकली चोरणारा गजाआडस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


मोटारसायकली चोरणारा गजाआड


। नगर । दि.19 जून । दुचाकी वाहने चोरणार्‍या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून दोन मोटासायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.


दत्तात्रय गणपत कासार (वय 40, रा. वडगाव गुप्ता, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपळगाव माळवी येथील सुरेश झिने हे घरी परतत असताना त्यांच्या मोटारसायकलीमधील पेट्रोल संपले. त्यामुळे संजय ठोंबरे यांच्या किराणा दुकानाजवळ मोटारसायकल उभी करून पेट्रोल आणण्यासाठी गेले असता मोटारसायकली नजरेस पडली नाही.


त्यामुळे सौ. झिने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार या चोरीचा तपास सुरू होता. दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना माहिती मिळताच, त्यांनी पोसई गणेश इंगळे, मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, दिपक शिंदे, रोहित येमुल, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, चंद्रकांत कुसळकर यांनी वडगाव गुप्ता परिसरात शोध घेतला. त्यानंतर कासार याला ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांत दिले. आरोपी कासार याने बेलापूर, श्रीरामपूर येथून आणखी एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only