Tuesday, June 8, 2021

अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली अटक


 नगर दिनांक 8 प्रतिनिधी


 घरात कोणीही नसतांना घरात शिरुन मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक

गुन्हे शाखेने कारवाई केली असून आरोपीच्या कब्जातुन मुद्देमाल हस्तगत केला आहे


आरोपी गणेश दिवाणजी काळे रा. वाकोडी फाटा, नगर याला अटक केली आहे.


 फिर्यादी  रणजितसिंग छोटेलाल यादव वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा. वाकोडी फाटा, नगर यांनी  माझ्या  घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेलो असतांना कोणीतरी आज्ञात इसमाने माझ्या परवानगीविना माझ्या राहत्या घरातून दोन माझे मोबाईल चोरुन घेवून गेले आहेत. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरून दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, , हे त्यांचे पथकातील अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना  कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा गणेश दिवाणजी काळे रा. वाकोडी फाटा, नगर यांनी केला असून तो सध्या वाकोडी फाटा येथे आलेला आहे अशी माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेका २३४ फकीर अब्बास शेख, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों कमलेश पाथरुट, मयुर गायकवाड चपोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून वाकोडी फाटा येथे जावून शोध घेतला असता आरोपी नामे गणेश दिवाणजी काळे वय २५ रा. वाकोडी फाटा, नगर यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करुन पुढील तपासासाठी आरोपी मुद्देमालासह पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.


वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गणेश दिवाणजी काळे याचे विरुध्द दाखल गुन्हे

 भिंगार कॅम्प पोस्टे. गुरनं. T११७/२०१७ भादवि कलम ४५७,३८०, ३४,भिंगार कॅम्प पोस्टे. गुरनं. १२१/२०१७ भादवि कलम ४५७,३८०, तोफखाना पो.स्टे. गुरनं. १५२/२०१७ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८०, ३४ धुळे दाखला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब,  अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,  . विशाल ढुमे , उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग,  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only