Wednesday, June 9, 2021

मोबाईल चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली अटकनगर दिनांक 9 प्रतिनिधी 


नेवासा तालुक्यातील देवगड फाटा  येथे मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणारे दोन आरोपी नाम स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले असून त्यांच्या कबजातुन १,०८,०९०/- रु. किं. चे मुद्देमाल हस्तगत केला.


 गणेश विठ्ठल आव्हाड, वय- २३ वर्षे, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, .नगर  सलीम सय्यद, रा. तामसवाडी, ता. नेवासा, .रा. एमआयडीसी, नगर 


दि. 4 रोजीचे यातील फिर्यादी . सलोम सांडू शेख, वय ४७ वर्षे, धंदा मोबाईल शॉपी, रा. जळके, ता. नेवासा यांचे देवगड फाटा. ता- नेवासा येथील सलीम मोबाईल शॉपी हे मोबाईलचे दुकान बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदर दुकाणाचे छताचा पत्रा काढून दुकाणामधील ५३,०००/- रु. किं. चे वेगवेगळ्या कंपणीचे मोबाईल चोरुन नेले होते.


 सदर बाबत फिर्यादी यांनी नेवासा पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३९६ / २०२९ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक . अनिल कटके,  हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा गणेश आव्हाड, रा. गजानन कॉलनी, .नगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफी मन्सूर सय्यद, पोना संतोष लोढे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, पोकों आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बर्ड, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, विजय धनेधर अशांनी मिळून एमआयडीसी, नगर परिसरात फिरुन मिळालेल्या बातमीनुसार आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १) गणेश विठ्ठल आव्हाड, वय- २३ वर्षे, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, नगर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देवून लागला. त्यानंतर अधिक विश्वासात घेवून गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार नाम सलीम सय्यद, रा. तामसवाडी, ता. नेवासा, ह.रा. एमआयडीसी, अ.नगर असे दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे , सलीम शौकत सय्यद, वय २३ वर्ष, ह. रा. एमआयडीसी, अ.नगर यांस ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल बाबत विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेले १० मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ५३,०००/-रु. किं. चा मुद्देमाल काढून दिल्याने तसेच सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर मो.सा. नं. एमएच-२०-डीए ६७९८ असा एकूण १,०८,०९०/-रु. किं.चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे. वरील नमुद आरोपी पैकी गणेश विठ्ठल आव्हाड हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी जबरी चोरी चोरी या सारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


 एमआयडीसी पो.स्टे. , एमआयडीसी पो.स्टे. , एमआयडीसी पो.स्टे. ., एमआयडीसी पो.स्टे. ., एमआयडीसी पो.स्टे.  एमआयडीसी पो.स्टे. , एमआयडीसी पो.स्टे. ., एमआयडीसी पो.स्टे. ., तोफखाना पो.स्टे. येथे अनेक कलमांतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only