Sunday, June 27, 2021

लेवल 3 नूसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध सर्व दुकाने, आस्थपना दुपारी चारनंतर बंद ॥ शनिवारी-रविवारी फक्त मेडिकलच राहणार सुरु

 


लेवल 3 नूसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

सर्व दुकाने, आस्थपना दुपारी चारनंतर बंद ॥ शनिवारी-रविवारी फक्त मेडिकलच राहणार सुरु


। नगर । दि.27 जून । राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश ‘ब्रेक दि चेन’च्या तिसर्या लेव्हलमध्ये केला. त्यानंतर शनिवारी स्थानिक जिल्हा प्रशासनाने निर्बंध-नियमावली जाहीर केली आहे. आज, रविवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळता सर्व दुकाने-बंद राहणार असून सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार आहेत. लग्न समारंभाला (केवळ 50, तर अंत्यविधीला 20 लोकांना उपस्थितीची परवानगी आहे. सलून आणि स्पा सुरू राहणार असले तरी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची अट आहे. हॉटेलमधून दुपारी चारनंतर आणि शनिवारी व रविवारी केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे.


करोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा झालेला शिरकाव आणि तिसर्या संभाव्य लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यासाठी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व तहसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानंतर सायंकाळी उशीरा याबाबतचे आदेश काढण्यात आले. यात नगर जिल्हा कोविड निर्बंधांच्या लेवल-3 मध्ये असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरकारच्या सुचनेनुसार निर्बंध लागू करण्यात आले.


यात सर्व तालुक्यातील सर्व दुकाने, आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच दर शनिवारी आणि रविवारी फक्त मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील (किराणा दुकाने सुद्धा बंद राहतील). जिल्हाधिकार्यांच्या आदेशात जिल्ह्यात दररोज सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत जमाव बंदी आणि त्यानंतर संचार बंदी लागू राहणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवा (एीीशपींळरश्र ीर्शीींळलश) पुरविणारे दुकाने आणि अस्थापना दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहिल. अत्यावश्यक वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने आस्थापना सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. शनिवारी पूर्णपणे बंद राहिल. मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह मल्टीप्लेक्स हे पूर्णपणे बंद राहणार आहेत.


- सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने, आस्थापना दुपारी चारनंतर बंद

- शनिवारी-रविवारी मेडिकल वगळता बाजार बंद

- सलून, स्पासाठी 50 टक्के क्षमतेचे बंधन

- लग्न समारंभाला 50, अंत्यविधीला 20 जणांची उपस्थिती

- दररोज सायंकाळी पाचपर्यंत जमाव बंदी, त्यानंतर संचारबंदी

- हॉटेलमधून दुपारी चारनंतर व शनिवार-रविवारी पार्सल सुविधेला मुभा


हॉटेल 50 टक्के ग्राहक क्षमतेवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहितील. त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार व रविवार पार्सल सेवा सुरू राहिल. सार्वजनिक ठिकाणी खुले मैदाने सायकलिंग, मॉरिंग वॉक दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहिल. ही सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत खेळता येतील. खासगी आस्थापना, कार्यालय हे सवलत दिलेल्या कार्यालया व्यतिरिक्त सुरू दुपारी चारपर्यंत सुरू राहिल. शासकीय (र्ॠेींशीपाशपीं) आणि खासगी ठिकाणी 50 टक्के हजेरी राहिल. मैदानी खेळांना सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत वेळ राहिल. सामाजिक, सांस्कृतिक व करमणूकीचे कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत होतील. लग्न समारंभाला 50 तर अत्यंविधीला 20 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका, निवडणूका, वार्षिक सर्वसाधारण सभा सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50 टक्क क्षमतेने घेता येतील.


- बांधकाम ठिकाणी राहणार्या मजूरांना बांधकामाची दुपारी 4 पर्यंत परवागनी राहिल.

- कृषी दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील, ई-कॉर्मर्स सेवा नियमित सुरू राहितील.

- जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. एसी बंद ठेवावा लागले.

- सार्वजनिक बस वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहिल. मात्र, उभे राहून प्रवासास बंदी राहिल. आंतरजिल्हा प्रवास, खासगी बस, कार, टॅक्स आणि दिर्घ पल्याच्या गाड्या सुरू राहतील.

- उत्पादन घटक, अत्यावश्यक माल, कच्चा माल तयार करणे घटक, सर्व पुरवठा साखळी घटक, सर्व निरंतर प्रक्रिया सुरू असणारे उद्योग असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत.

- राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणारे वस्तूंचे उत्पादन घटक, डाटा सेंटर, आयटी सेवा नियममित सुरू राहिल. - उर्वरित इतर क्षेत्रातील उत्पादन घटक 50 टक्के क्षमतेने आणि प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only