Tuesday, June 29, 2021

रोहिणी शेंडगे महापौर व गणेश भोसले उपमहापौरनगर दिनांक 28 प्रतिनिधी नगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी(28 जून) दाखल झाला आहे. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत करता मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने उपमहापौर पदाकरता गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .दरम्यान  महापौर व उपमहापौर पदाकरता प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे महानगरपालिकेची निवडणुकी बिनविरोध झाली आहे. उद्या अधिकृत घोषणा केली जाणार आहे . आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे 4 नगरसेवक सुद्धा यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यादा महापौर व उपमहापौर पदाची निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्थात ही तिसरी बिनविरोध निवडणूक आहे. याआधी 2012 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या  सुवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज मतदाना आधी मागे घेतल्याने शिंदे बिनविरोध महापौर झाल्या तर 2016 मध्ये सेनेच्या सुरेखा कदम यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम बिनविरोध महापौर झाल्या. 2021 मध्ये म्हणजे आता विरोधकांचे अर्ज न आल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस चा उपमहापौर सुद्धा बिनविरोध  झाला आहे, अधिकृत घोषणा उद्या केली जाणार आहे.


भोसले यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप,  शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते ,विनीत पाऊलबुद्धे,संजय शेंडगे, संजय चोपडा, सुभाष लोंढे,दत्ता कावरे, नगरसेवक गणेश कवडे, कुमार वाकळे, अजिंक्य बोरकर, श्याम नळकांडे,  जहागीरदार, सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, दीपक सूळ, बाळासाहेब पवार धनंजय जाधव निखिल वारे, फारूक शेख, उबेद शेख, प्रशांत गायकवाड, सचिन जाधव,मुद्दारसर शेख, प्रकाश भागानगरे,  चैतन गुंदेचा, समद खान,जॉन  लोखंडे, आदी उपस्थित होते.महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक उद्या दिनांक 30 रोजी होत आहे काल महापौर पदासाठी महा विकास आघाडीकडून शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी अर्ज दाखल केला होता उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे या पदाकरता असून गणेश भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला या निवडणुकीमध्ये दोघांचे ही एक-एक आले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून त्याची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थनिक स्वराज्य संस्थामध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला होता त्यानुसार आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका पाडत आहोत. नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी शेडगे यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला होता, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सर्वांनी आम्हाला साथ दिली त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असेही ते म्हणाले राज्यामध्ये आगामी काळात सुद्धा महाविकासआघाडी अशा पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले महा विकास आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असे योगदान मिळेल, त्यासाठी स्थानिक पातळीवर चे आमदार व लोकप्रतिनिधी निश्चितपणे मदत करतील असेही ते म्हणाले. नगर मध्ये भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक प्रकारे उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला विरोधासाठी विरोध केला नाही ही असेही काकडे म्हणाले.


यावेळी बोलताना गणेश भोसले म्हणाले की महा विकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे, मला शिवसेनेसह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी साथ दिली व ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असून आता उपमहापौर पदाच्या माध्यमातून नगर शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. नगर शहर हरित नगर करण्याचा तसेच शहरात वृक्ष गणना करण्यास प्राधान्य देणार आहे. तसेच पाणी, स्वछता व पथदिवे हे प

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only