Wednesday, June 16, 2021

१९/०६/२०२१ *रोजी अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या महत्वाच्या कामासाठी शट डाउन घेत असले बाबत*अहमदनगर महानगरपालिका

विषय दि १९/०६/२०२१ *रोजी अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या महत्वाच्या कामासाठी शट डाउन घेत असले बाबत..*


     उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शनिवार दि.१९/०६/२०२१ रोजीअहमदनगर महानगरपालिके मार्फत राबविण्यात येत असलेल्या  केंद्रशासित अमृत अभियान

अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या खालील नमूद महत्वाच्या कामासाठी शट डाउन घेण्याचे नियोजन

करण्यात आलेले आहे.

१) मुळानगर पंपीग स्टेशन येथे कार्यरत ४०० एच पी पंपाचे पाणी वाहुन नेणारी ६०० एम एम

मृदु लोखंडी जलवाहिनीचा ३७ मिटर अंतरातील नविन पाईप टाकणे / बदलणे.

२) मुळानगर बी पी टी (संतुलन टाकी) येथील ७०० एम एम व ११०० एम एम आउट लेटला

मॅनिफोल्ड बसविणे.

३) विळद येथून येणारी ८१३ एम एम व्यासाची शुध्द पाण्याची वितरिका वसंत टेकडी येथे

नव्याने बाधलेल्या मुख्य संतुलन टाकीस जोडणी करणे. (इनलेट कनेक्शन करणे)

४) वसंत टेकडी येथे नव्याने बाधलेल्या मुख्य संतुलन टाकीचा आउट लेट वितरण

व्यवस्थेतील कार्यरत १००० एम एम जलवाहिनीस जोडणी करणे

तसेच अस्तित्वातील अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीची

कामे ही हाती घेण्यात येणार आहे.

सदर कामे ही विस्तृत स्वरूपाची असल्याने शनिवार दि.१९/०६/२०२१ रोजी सकाळी

११.०० वाजले पासून रविवार दिनांक २०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यत इतका कालावधी

अपेक्षित आहे. सदर शट डाउन काळात मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद

राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

त्यामुळे शनिवार दि.१९/०६/२०२१ रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील

गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, व तसेच स्टेशन रोड, सारसनगर,

बुरूडगाव रोड, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास

सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणी पुरवठा होउ शकणार नाही. या भागास

दि.२०/०६/२०२१ रोजी उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

तसेच रविवार दिनांक २०/०६/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या

मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव, दिल्ली गेट, चितळे रोड,

अनंदी बाजार, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी परिसरात

महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणी पुरवठा हा रविवार

ऐवजी सोमवार दि.२१/०६/२०२१ रोजी उशिराने व कमी दाबाने होईल.

व सोमवार दि. २१/०६/२०२१ रोजी रोजी पाणी पुरवठा होवू घातलेल्या सर्जेपुरा, मंगलगेट,

झेंडीगेट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, कलेक्टर ऑफीस परिसर

माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान

हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो मंगळवार

दि.२२/०६/२०२१ रोजी उशिराने व कमी दाबाने होईल.

तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून

महानगरपालिकेस सहकार्य करावे..

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only