Wednesday, June 9, 2021

डॉक्टर राजूरकर यांनी आरोग्य अधिकारी पदाचा स्वीकारला पदभार


 नगर दि 9 प्रतिनिधी


महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर सतीश राजूरकर यांनी आज आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान डॉक्टर बोरगे प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहे.


महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त गोरे यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते व त्यांच्याकडील असलेल्या पदाचा पदभार हा महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजूरकर यांच्याकडे देण्यात आला होता. डॉक्टर राजूरकर यांनी आपल्या पदाचा पदभार आज दुपारी घेतला आहे.


डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर त्यांनी आपल्याला हे मान्य नसल्याचे सांगत लेखी स्वरूपाचे पत्र चार पानांचे आयुक्त त्यांना दिलेले आहे. आयुक्त यांनी या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे उपायुक्त यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन त्याबाबतचे पत्रही दिले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only