Wednesday, June 30, 2021

नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले बिनविरोध निवड जाहीर


नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले बिनविरोध निवड जाहीर


नगर दि  30 प्रतिनिधी 


नगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. आज पीठासीन अधिकारी तसेच नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर केली आहे.


नगर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले होते. महापौरपदासाठी महाविकास आघाडीच्या कडून शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.


आज सकाळी 11 वाजता नगर महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, महानगरपालिकेचे नगर सचिव एस बी तडवी, आदी यावेळी उपस्थित होते.


सकाळी 11 वाजता उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. महापौर पदासाठी शेंडगे यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते ते सुरुवातीला वैध झाले तर त्यानंतर उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांचे तीन अर्ज होते अर्जाच्या छावणीमध्ये तिने अर्ज हे वैध ठरले होते, त्यानंतर त्यांना उमेदवारी माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आलेला होता. तो अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी भोसले यांनी या दोन्ही पदाच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यामध्ये महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी बोलताना महापौर रोहिणी शेंडगे म्हणल्या की, शहरातील पाणी प्रश्न हा महत्त्वाचा असून सुरू असलेली ही योजना पूर्णत्वाला कशा पद्धतीने नेता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे .शहरांमध्ये अनेक रस्त्यांची बिकट परिस्थिती झाली असून ते रस्ते चांगल्या पद्धतीने व दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहरातील महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयची सुद्धा दुरावस्था झालेली आहे ती सुद्धा दुरुस्त केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, नगर शहर स्वच्छ व सुंदर कशा पद्धतीने केले पाहिजेत तसेच हरित नगर करण्याची संकल्पना घेऊन आपल्याला आगामी काळामध्ये वाटचाल करायची आहे तसेच महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा शिस्त लावण्याची गरज असून त्या साठी  सुद्धा कठोर पावले उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only