Saturday, June 12, 2021

मी वेगळी काय भूमिका घेतली, ते सांगावे... छत्रपती संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हानमी वेगळी काय भूमिका घेतली, ते सांगावे...

छत्रपती संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

अहमदनगर/प्रतिनिधी-मी मोर्चा काढणार असल्याचे जाहीरकेलेले नाही. फक्त मूक आंदोलन करणार तसेच समाज व लोक बोलले असल्याने आतालोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण विषयावर बोलावे, एवढेच बोललो आहे. यापेक्षाकाय वेगळी भूमिका मी घेतली, हे सांगावे, असे आव्हान छत्रपती संभाजीमहाराजयांनी शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. येत्या 16 रोजीकोल्हापुरात मूक आंदोलन करणार आहे, मोर्चा काढणार नाही, असेही त्यांनीयावेळी आवर्जून स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी महाराज शनिवारी कर्जत तालुक्यातीलकोपर्डीला आले होते व तेथून औरंगाबाद रस्त्यावरील कायगाव टोका येथेजात असताना काहीकाळ नगर महापालिकेजवळ थांबले होते. येथे मराठा सेवा संघाचेजिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक निखील वारे,बाळासाहेब पवार व अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशीबोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
चंद्रकांत पाटील यांनी महाराजांनी एक भूमिका घेण्याचेवक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता संभाजी महाराजांनी कोणाचेही नाव घेतलेनाही. पण ते म्हणाले, मी कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. रायगडावरूनबोलतानाही मी मोर्चा जाहीर केला नव्हता. तर भूमिका जाहीर करणार असे बोललोहोतो. त्यानंतर तशी भूमिका कोल्हापूरला जाहीर केली. मोर्चा नव्हे तर मूकआंदोलन करणार असेच तेथे बोललो होतो व त्यानंतर लोकप्रतिनिधींनी या विषयावरबोलावे, असे आवाहन केले होते. यापेक्षा कोणतीही वेगळी भूमिका मी घेतलेलीनाही, आक्षेप घेणारांनी सांगावे, मी वेगळी कोणती भूमिका घेतली?, असे आव्हानत्यांनी दिले. 


मराठा आरक्षणासाठी आता दोनच मार्ग शिल्लक आहेत. एकम्हणजे सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन राज्य सरकारनेच दाखल केले पाहिजे व दुसरेम्हणजे मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून त्याचा अहवालराज्यपालांद्वारे राष्ट्रपतींकडे पाठवणे व राष्ट्रपतींनी केंद्रीय मागासआयोगाकडे पाठवून त्यांच्याकडून राज्य मागास आयोगाकडे पुन्हा आल्यानंतरत्यांच्या शिफारशीनुसार संसदेत हा विषय मांडणे, असा एक मार्ग आहे. या सर्वप्रक्रियेसाठी एक ते सव्वा वर्षाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे या काळात राज्यसरकारने मी केलेल्या पाच मागण्या मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर समाजाचा दबावआणणे गरजेचे आहे, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, यासाठी येत्या 16 रोजी मूकआंदोलन करणार आहे तसेच आतापर्यंत समाज बोलला आहे, आम्ही बोललो आहोत,नगरसेवक व लोक बोलले आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणजेआमदार-खासदारांनी यावर बोलले पाहिजे. मी मांडलेल्या 5 मागण्या मंजूरकरण्यासाठी 36 जिल्ह्यांचा दौरा मी करणार आहे. पण तो होऊ नये व त्याआधीचनिर्णय व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. पण तसे झाले नाही तर मुंबईत विधानभवनावर लाँगमार्च काढण्याचा निर्णय मी घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only