Sunday, June 6, 2021

मेडिकल चे वापरून झालेले साहित्य रस्त्यावर फेकण्याचा धक्कादायक प्रकार शहरात नगर दि 6 प्रतिनिधी सध्या कोरोनाचा विषय सर्वच सुरू झाला असताना नगर शहरामध्ये तारकपुर स्टँड च्या जवळील भागांमध्ये रस्त्यावरच कोरोना उपचारासाठी  वापरलेल साहित्य रस्त्यावर फेकून दिल्याची घटना आज उजेडात आल्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. दरम्यान महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पुढील कारवाई सुरू केलेली आहे.


शहरामध्ये जे रुग्णालय आहेत त्यांना आपल्याकडील असलेला वैद्यकीय क्षेत्राला लागणाऱ्या औषधाचा वापर झाल्यानंतर त्याचा कचरा हा व्यवस्थित रित्या सांभाळून ठेवून तो नंतर महानगरपालिकेच्या येणाऱ्या वाहनांमध्ये द्यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. याचे शहरांमध्ये पालन होताना दिसत आहे मात्र दुसरीकडे आज तारकपूर बस स्थानकाच्या समोर असणाऱ्या एका ठिकाणी कोरोना उपचारासाठी  वापरण्यात येणारे औषधांचे जे जे काही साहित्य आहे त्याचा वापर झाल्यानंतर ते सर्रासपणे रस्त्यावर टाकून देण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलेला आहे. आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करून त्यांना याची माहिती दिली आहे.


वास्तविक पाहता अशा प्रकारचा असलेला मेडिकलचा वापर झाल्यानंतर जो कचरा व्यवस्थित रित्या टाकायला पाहिजे त्याची ही रसाळ होताना दिसत आहे त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


दरम्यान या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरागे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सदरचा कचरा उचलण्यासाठी तात्काळ महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी त्याठिकाणी पाठवले आहेत नेमका याचा उलगडा झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only