Monday, June 14, 2021

तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मारहाणीत मृत्यूनगर : तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यात रामवाडी येथील  कचरू दत्तू कांबळे (वय 45 रा. रामवाडी, नगर) याचा मृत्यू झाला आहे.


याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी दोघे जण कांबळे यांना त्यांच्या घरून घेऊन गेले होते. त्यांना मारहाण करून सायंकाळी घरी आणून सोडले. मारहाणीत कांबळे यांना मार लागल्याने व वेळीत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची महिती समोर आली आहे. याबाबत  संबंधित मयताचे नातेवाईक यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तोफखाना पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only