Friday, June 11, 2021

पारनेरात 'खून का बदला खून से' ? नारायण गव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घुण हत्या.पारनेरात 'खून का बदला खून से'  ?


नारायण गव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घुण हत्या.


तालुका पुन्हा हादरला


पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण येथे सुमारे अकरा वर्षापूर्वी घडलेल्या प्रकाश कांडेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच नारायण गव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची आज दुपारच्या सुमारास निर्घुण हत्या करण्यात आली. शेळके ही खून प्रकरणात शिक्षा भोगत होते. मात्र,कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या ते पॅरोलच्या रजेवर होते.


 या संदर्भातील माहिती अशी की, गाव पातळीवरील राजकीय वादातून 13 नोव्हेंबर 2010 रोजी पुणे-नगर महामार्गावर महिंद्रा हॉटेल जवळ प्रकाश कांडेकर यांच्या डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. खून प्रकरणातील गोळी गायब होण्याचे प्रकरणही गाजले होते. यावरून काही अधिकाऱ्यांचे निलंबन नाही झाले होते. प्रकाश कांडेकर खून प्रकरणात माजी सरपंच राजाराम शेळके मुख्य आरोपी असल्याचे सिद्ध झाल्याने ते कारागृहात शिक्षा भोगत होते मात्र,सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे ते पॅरोलच्या रजेवर आले होते.


आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजाराम शेळके हे नारायण गव्हाण येथील आपल्या मालकीच्या शेतात काम करीत असताना अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात वार केले होते. त्यात त्यांचा गळा चिरल्याने उपचारासाठी शिरूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले .या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.


दरम्यान, राजाराम शेळके यांची हत्या प्रकाश कांडेकर यांच्या हत्या प्रकरणामुळेच झाली का ? खूनाचा बदला खूनानेच घेतला का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only