Monday, June 21, 2021

ओ बी सी, बाराबलुतेदार महासंघाची मंगळवारी नगरमध्ये 'चिंतन' बैठक प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळेंसहित राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांचा सहभाग : जिल्ह्यातून उपस्थिती ओ बी सी, बाराबलुतेदार महासंघाची मंगळवारी नगरमध्ये 'चिंतन' बैठक  


प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळेंसहित राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांचा सहभाग : जिल्ह्यातून उपस्थिती 


नगर : महाराष्ट्र बाराबलुतेदार महासंघ व प्रजा लोकशाही आघाडीचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ईशाज कॅफे (शिलविहार रोड, श्रीराम चौक) येथे मंगळवारी (दि.२२) सकाळी १० वाजता बाराबलुतेदार-अलुतेदार व भटके विमुक्तांची "चिंतन बैठक" आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष माउली गायकवाड यांनी दिली. 


ओ बी सीची जातनिहाय जनगणना, बाराबलुतेदार आर्थिक विकास मंडळ, ओ बी सी राजकीय आरक्षण ,'रोहिणी' अयोग्य लागू व्हावा महाज्योतीला चालना व अनुदान , बलुतेदार -अलुतेदार -भटके विमुक्त संदर्भात धोरण ठरविणे व प्रशिक्षण केंद्र सुरु करणे, विद्यार्थी शिक्षण - नौकरी व एम पी  एस सी चे प्रलंबित प्रश्न, नेमणूक ओ बी सी आयोगा संदर्भात चर्चा आदी मुद्यांवर चिंतन बैठकीत होणार आहे. प्रदेशाध्यक्ष श्री.दळे  व त्यांच्या समवेत राज्यातील विविध समाजाचे नेते यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या चिंतन बैठकीसाठी महासंघाचे नगर शहरासह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकारी , सदस्यांना निमंत्रित केले आहे.             


श्री.दळे अहमदनगर जिल्ह्यापासून राज्याच्या दौऱ्यावर असून राज्यात ठिकठिकाणी चिंतन बैठका आयोजित केल्या आहेत. नगरच्या चिंतन बैठकी नंतर श्री.दळे आणि अन्य नेते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तरी संबंधितांनी उपस्थित राहून चळवळीला हातभार लावावा असे आवाहन श्री.गायकवाड यांनी केले आहे. 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only