Sunday, June 6, 2021

जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत सुरू होणार प्रशासनाने दिले आदेशनगर दिनांक 6 प्रतिनिधी


गेल्या दोन महिन्यापासून सर्वत्र व्यवहार बंद होते राज्यशासनाने काल नवीन नियमावली जाहीर करून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले आहेत त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये सर्व निर्बंध उठले असून उद्या दि 7 रोजी नियमित वेळेमध्ये सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत काल निर्बंध उठल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती त्यानुसार प्रशासनाने आज लेखी आदेश दिले आहे.


दिलेल्या आदेशामध्ये अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने,आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील.


 बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने,आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील.. मॉल, चित्रपटगृहे (मल्टीपेक्स तसेच सिंगल स्क्रिन), नाटयगृहे 50% क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत राहतील.


 रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत. ,. खाजगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील., सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये 100% उपस्थितीसह कार्यरत राहतील.

. सर्व क्रिडाविषयक क्रियाकल्प चालू ठेवणेस परवानगी असेल. सर्व प्रकारच्या चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.


 बंदीस्त सभागृहामध्ये लग्न समारंभाचे आयोजनास एकुण आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्तीं या पैकी जे कमी असेल तितक्या व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहील. तसेच खुल्या जागेतील लग्न समारंभाचे आयोजनास जास्तीत जास्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. अंत्यविधीस 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील असे आदेशात म्हटले आहे


. स्थानिक स्वराज्य संस्था , सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनास/ निवडणूकांस निर्बंध असणार नाहीत.,. सर्व प्रकारचे बांधकाम क्रियाकल्प चालू राहतील., कृषीविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील. वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार चालू राहतील. , व्यायामशाळा, सलुन, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील., सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही निर्बंधाविना चालू राहिल. सर्व प्रकारची कार्गों वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह) चालू राहील. , खाजगी कार/टॅक्सी / बस /दिर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल. तथापि,


निबंधस्तर 5 मधील क्षेत्रातून सूटणा-या किंवा अशा क्षेत्रात थांबा असणा-या वाहतूकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई-पास असणे बंधनकारक असेल.

. सर्व प्रकारची औदयोगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेत चालू राहतील.

या आदेशान्वये ज्या अटी   आहे, सर्व ठिकाणी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरचे पालन करणे बंधनकारक असेल व याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभाग, परिवहन विभाग इ. यांची राहील. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखाची राहील असे आदेशात म्हटले आहे


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उपरोक्त आदेश अंमलबजावणी जिल्हयाचा कोविड पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण याबाबतचा आढावा घेऊन शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये या आदेशामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.


या आदेशामध्ये नमुद नसलेल्या इतर बाबींबाबत या पूर्वीचे आदेश कायम राहतील. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (SDMA) आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील. कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम काही अनुभव तोच दंडास पात्र राहील असे आदेशामध्ये म्हटले आहे


नगर जिल्ह्यामध्ये काल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज लेखी आदेश देऊन सर्व निर्बंध उठवले आहेतPost a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only