Wednesday, June 30, 2021

मार्केट यार्ड परिसरातील घटना दोन लाखाची रोकड बॅगेसह लांबविलीमार्केट यार्ड परिसरातील घटना

दोन लाखाची रोकड बॅगेसह लांबविली

नगर,ता.30- मार्केट यार्ड परिसरातून बीडच्या व्यापार्‍याचे 70 हजार चोरल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरातील महात्मा फुले चौकातून एकाची 2 लाखाची रक्कम असलेली बॅग अज्ञात तीन चोरट्यांनी भरदुपारी चोरून नेली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी केतन पोपटराव शेेंडगे (वय 34, रा. भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेंडगे यांच्या गाडीची काच फोडून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून तसेच त्यांचे दुसरीकडे लक्ष वळवून अज्ञात इसमांनी 2 लाखाची रक्कम असलेली बॅग चोरून नेली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात तीन चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक कचरे करीत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only