Friday, June 25, 2021

त्या महिलेच्या जिद्दीला सलाम....पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्यांचे व डॉक्टरांचे स्वतः जाऊन मानले आभारनगर दि. 25 प्रतिनिधी 


कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी पार पाडणे मध्ये सर्वच काळजी घेत असतात, नगरच्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याचे पत्नीने कोरोनाशी अशी तब्बल 68 दिवस यशस्वी झुंज दिली... आज पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या जिद्दीला व डॉक्टरांनी केलेल्या उपचाराबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी खुद्द नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी थेट आज रुग्णालय मध्ये जाऊन डॉक्टर व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे चा कहर गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला होता .अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले तर काहीजणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले अशा घटना  जिल्ह्यांमध्ये घडलेल्या होत्या.


आपले कर्तव्य बजावत असत पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असते, कोविड काळामध्ये तर मोठी कसरत पोलीस प्रशासनाला करावी लागली,  कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी होतीच, पण त्यात पोलीस दलातील कर्मचारी गणपत  धायतडक यांच्या पत्नी विमल यांना करोनाची  त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तात्काळ नगर येथील सावेडी  परिसरात असलेल्या नोबेल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, ज्यावेळेला त्याची तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना स्कोर हा 25 पैकी 24 गेलेला होता, गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते साधारणता पन्नासहून अधिक दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या,त्यांचेवर डॉक्टर बापूसाहेब काडेकर यांच्या अधिपत्याखालील तेथील टीमने त्यांच्यावर उपचार केले . तब्बल 63  दिवस त्यांनी एक प्रकारे करोनाशी झुंज दिली,जिद्द सोडली नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, संबंधित महिला 63 दिवसानंतर  बरे झाल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.


जेव्हा पासून धायताडक यांना दवाखान्यामध्ये ठेवण्यात आले तेव्हापासून नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी डॉक्टर कांडेकर, यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तब्येतीची सातत्याने विचारपूस केली होती. त्या कुटुंबाच्या घरी मोठे कोणी नव्हते त्यांना नगर येथील घरघर लंघर संस्थेमार्फत भोजनाची व्यवस्था केली, त्याचा त्यांना मोठा आधार झाला. 


 जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  समक्ष नगरचा नोबल हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टर कांडेकर यांची भेट घेतली, गेल्या 63 दिवसापासून कांडेकर व त्यांच्या टीमने चांगल्या पद्धतीचे सेवा दिली तसेच घर घर लंघर सेवेच्या माध्यमातून त्या कुटुंबाला जेवणाचा मोठा आधार मिळाला, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा काळजी घेतली, त्याबद्दल अधीक्षक पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.


यावर सामाजिक कार्यकर्ते हरजित वधवा,प्रदीप पंजाबी, जनकसेठ आहुजा,  नगर जिल्हा पोलीस शाखेतील पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, राहुल बजाज,करण धुप्पड, कैलास नवलानी, सुनील थोरात आदी या वेळी उपस्थित होते.अधीक्षक पाटील यांनी वधवा व त्यांच्या टीमचे सुद्धा आभार मानले.


डॉक्टर कांडेकर यांनी आमच्याकडे अनेक रुग्ण हे बरे होऊन गेलेले आहे आणि काहीजण उपचार घेत आहे अनेक दिवसापासून धायतडक या उपचार घेत होत्या, त्यांची जिद्द सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती, आमच्या या टीमने सुद्धा उपचार दिले व  त्यांना बरे केले. याअगोदर आमच्याकडे 48 दिवसानंतर बरे झालेला रुग्ण होता पण आता या 68 दिवसानंतर ह्या बरे झालेल्या रुग्ण आहे असे ते म्हणाले.चौकट

जिद्द, इच्छाशक्ती असेल तर निश्चीतपणे मार्ग निघतो... धायतडक यांनी जिद्द दाखवल्यामुळे व त्यांना वेळीच उपचार  मिळाल्यामुळे त्यांनी कोरोना वर  मात करता आली. अशाच प्रकारे नागरिकांनी सुद्धा भयभीत न होता जिद्द दाखवली तर निश्चीतपणे मार्ग निघू शकतो असा विश्‍वास अधीक्षक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only