Wednesday, June 30, 2021

पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात व्यापारी अनिल गावडे सहआरोपी
*पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात व्यापारी अनिल गावडे सहआरोपी*

(प्रतिनिधी) :राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास  Dy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग होताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास  उत्तरप्रदेश येथून शिताफीने अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु राहुरी पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे यास सहआरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे कलम वाढवून   न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only