Monday, June 21, 2021

हातामध्ये सतुर घेवून दहशद घालणारा आरोपी भीमा सकट जेरबंद , अहमदनगर स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्याकेडगांव इंडस्ट्रीअल परिसरामध्ये ए.सी.सी. सीमेंट कंपनीची जाळपोळ करुन हातामध्ये सतुर घेवून दहशद घालणारा आरोपी भीमा सकट जेरबंद , अहमदनगर स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या


केडगांव इंडस्ट्रीअल परिसरामध्ये ए.सी.सी. सीमेंट कंपनीची जाळपोळ करुन हातामध्ये सतुर घेवून दहशद घालणारा आरोपी जेरबंद , स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने भीमा सकट याला ठोकले बेड्या  दि . १५/६/२०२१ रोजी फिर्यादी नामे . मल्लीनाथ हनुमंत बोगले वय ४४ धंदा ए.सी.सी. सी.एस. रघोजी मैनेजर यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की दिनांक १५/६/२०२१ रोजी साय . १७/१५ वा , सुमारास केडगांव इंडस्ट्रीअल एरिया अहमदनगर मधील ए.सी.सी. सीमेंट कंपनीचे ऑफीस मध्ये इसम नामे भिमा सकट रा . स्टेशन रोड , अहमदनगर यांस त्याचे मानकाने फिर्यादीच्या कंपनीचे सांगण्यावरुन कामावरुन काढून टाकल्याच्या रागापोटी फिर्यादीच्या ऑफीसमध्ये येवून सतुरचा धाक दाखवून शियोगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की करुन निघून गेला व त्यानंतर रात्री २८०० वा . सुमारास भिमा सकट व त्याचे तिन अनाळखो सार्थादार याना फिर्यादीच्या ऑफीसच्या खिडीकीची काच फोडून काहीतरी ज्वलनशील पदार्थ आत टाकून आग लावून ऑफीसचे नुकसान केले म्हणून आज रोजी कोतवाली पो.स्टे . ला दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. १ ४१७/२०२१ भादवी कलम ४३६,३२३,५०४,५०६ सह अर्म अॅक्ट ४/२५ अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा आद्याप पावेतो फरार होता , स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर आरोपीचा शोध घेवून सुध्दा तो मिळून येत नव्हता , तसेच दि . १७/६/२०२१ रोजी फिर्यादी नामे- सोमनाथ अभिमन्यु लोखंडे वय ३ ९ धंदा ड्रायव्हर यांनी नगर ता . पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली को , दिनांक १७/६/२०२१ रोजी सकाळी ० ९ / ०० बा , के.सी. रोलर अॅण्ड फलोअर मिलचे समोर , चास शिवार ता . जि . अहमदनगर येथे माझी गाडी एम.एच. १२ के.पी. ४५७८ ही गाडी भरुन गाडीत आटा भरुन पार्कोगमध्ये लावली होती . तेथे ० ९ / ३० वा . भिमा सकट हा विनानंबर प्लेटची मोपेड गाडी घेवून आला व मला म्हणाला की , " रघुजी ट्रान्सपोर्टची कोणतीही गाडी मो चालु देणार नाही मला दिसल्यास मी ती फोडून टाकौन " असे म्हणून त्याने गाडीवर दगडफेक करुन सदर गाडीची समोरील काच फोड़न माझ्या गाडीच्या केबीनमध्ये येवून मला शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या खिशातील २००० / - रुपये बळजबरीने काढले व मला म्हणला की , “ यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टची गाडी मला दिसल्यास मी ती फोडून जाळून टाकेल " म्हणून आज रोजी नगर ता . पो.स्टे . ला दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. १ ३२३ / २०२१ भादवी कलम ३ ९ २ , ३२३ , ५०४,५०६ ४२७ अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब यांनी सदर गुन्ह्याचे गाभिय पाहता व सदर आरोपीची वाढती दशहत याकरीता श्री अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अ.नगर यांना सदर आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार करुन सदर आरोपी याला अटक करण्यासाठी सुचना केल्या . त्यानुसार पोनि श्री अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनथ दिवटे , पोहेकॉ संदीप घोडके , पोना / संदीप पवार /शंकर चौधरी / रवि सोनटक्के /लक्ष्मण खोकले , पोक / योगेश सातपुते /कमलेश पाथरुट /जालींदर माने  यांचे स्वतंत्र पथक तयार करुन सदर आरोपी याला अटक करण्याचा सुचना केल्याने सदर पथकातील अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके साो . यांना गुप्त खबन्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , सदर गुन्हयातील आरोपी नामे भिमा सकट , रा . स्टेशन रोड , अहमदनगर हा केडगाव परिसर येथे आल्ना असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे भिमा सर्जेराव सकट वय ३२ वर्षे रा . स्टेशन रोड , अहमदनगर यास ताब्यात घेवून सदर दोन्ही गुन्ह्याच्या अनुशगाने विचारपूस केली असता त्यानी सदर दोन्ही गुनद्याची कबुली दिल्याने सदर आरोपीयास पुढील कार्यवाहीसाठी कोतवाली पोस्टेला हजर केले आहे . पुढील कार्यवाही कोतवाली पोस्ट करत आहेत . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साो , पोलीस अधिक्षक , अहमदनगर श्री , सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , व मा . श्री . विशाल ढुमे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अहमदनगर , श्री अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only