Saturday, June 19, 2021

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये विना मास्क फिरण्यावर तीस जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नगर दि:19 प्रतिनिधी


 राज्यात सध्या सर्वत्र अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली असताना अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नगर शहरामध्ये तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये विना मास्क फिरण्यावर तीस जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.


सर्वत्र अनलॉक ची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सध्या व्यवहार सुरळीत होऊ लागलेले आहे .जिल्हा प्रशासनाने जे नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे अनेक ठिकाणी पालन होत नाही हे दिसून येत आहे. आज तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सावेडी उपनगरांमध्येच पाच ते सहा ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती, तसेच जे कोणी विना मास्क फिरत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आले आहे . दिवसभरामध्ये तीस जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे .आज सायंकाळी नंतर सुद्धा अनेक ठिकाणी पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे त्याचप्रमाणे ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशांना दंड ठोठावण्यात आलेला आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only