Tuesday, June 1, 2021

तोफखाना पोलिसांनी केले घरफोड्या रोखण्यासाठी बिट मार्शलचे नियोजन

तोफखाना पोलिसांनी केले घरफोड्या रोखण्यासाठी बिट मार्शलचे नियोजन


अहमदनगर ; नगरसह उपनगरात चोरीचे सत्र दिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी उपनगर चोऱ्या रोखण्यासाठी मोठे नियोजन केले आहे. तोफखाना पोलिसांनी उपनगरातील 8  पॉइंट नेमले आहे.  या ठिकाणी पोलिसांचे गस्ती पथक 24 तास लक्ष ठेवणार आहे. त्या ठिकानी पोलिसांनी नोंदवही देखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बंदोबस्तवर असणाऱ्या प्रत्येक पोलिसांला सही, फोटो, लोकेशन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसचा मोठा फौज फाटा आता 8 पॉईंटवर लक्ष ठेवून असणार आहे. जर एखाद्यानर कर्तव्यत कसूर केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज तोफखाना पोलिसांनी त्या पद्धतीने नियोजन सुरू केले आहे. आता रात्रीच्या वेळी दस्ती पथकेही उपनगरांमध्ये येणार आहे रस्त्यावर विनाकारण देणार यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. या आठ पॉईंटवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only