Monday, June 14, 2021

तोफखाना पोलीस ठान्या हद्दीमध्ये नियुक्त झाली तात्पुरती डीबी

 


तोफखाना पोलीस ठान्या हद्दीमध्ये नियुक्त झाली तात्पुरती डीबीनगर दिनांक 14 प्रतिनिधी 


सावेडी उपनगर परिसरामध्ये सध्या भुरट्या चोऱ्या ,घरफोडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत चाललेले आहे. गुन्हेगारांना तात्काळ अटक व्हावी व अवैध धंद्यांना  आळा बसावा या उद्देशाने तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुन्हा डीबी म्हणजे तो खाना तपास पथक कार्यान्वित करण्यात आली आहे.या डीबी मध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे हे त्याचे प्रमुख असून त्यांच्या अधिपत्याखाली सय्यद शकील लतीफ ,अविनाश वाकचौरे, वसीम रशिद पठाण ,अहमद परवेज इनामदार ,शैलेश उत्तमराव गोमसाळे, सचिन उत्तम जगताप ,अनिकेत आंधळे,यांचा समावेश आहे.


तोफखाना पोलीस ठाणे मध्ये अगोदर डीबी ही कार्यरत होती, मात्र काही प्रमाणामध्ये अंतर्गत घडामोडी झाल्यामुळे सदरची डीबी ही रद्द करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरन देण्यात आले होते, त्यानंतर तोफखाना पोलिसांनी ही डीबी बरखास्त केलेली होती,


 नव्याने डीबी नियुक्त करण्याचे निर्णय सुद्धा झाला होता, त्या अनुषंगाने येथील तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्पुरता स्वरूपामध्ये डीबी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ती डीबी नियुक्त करण्यात आलेली आहे, दरम्यान सावेडी उपनगरांमध्ये वाढती गुन्हेगारी याला आळा बसावा तसेच अवैध धंद्यांना चाप बसावा हा त्यामागचा उद्देश आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only