Monday, June 28, 2021

युवतीशी मैत्री करुन नंतर बदनामीची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्या प्रकरणी. तोफखाना पोलिसात गुन्हा दाखलएका युवतीशी मैत्री करुन नंतर बदनामीची धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्या प्रकरणी, तसेच बदनामीची धमकी देऊन सोन्याचे दागिने लाटल्याप्रकरणी एका युवकावर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल अख्तर सय्यद (रा.मुकुंदनगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे.


एप्रिल 2021 ते जून 2021 या काळात ही घटना घडली. पीडित युवती व आरोपी हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. आरोपीने युवतीचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेत युवती बरोबर फोटो काढले. त्यानंतर सोलापूर रोडवरील एका लॉजवर नेऊन बळजबरीने गोळी खाऊ घातली व दोन वेळा बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर बदनामीची धमकी देत आरोपीने युवतीकडून सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा बदनामीची धमकी देऊन पुन्हा बळजबरीने अत्याचार केला. यापुढेही संबंध कायम ठेव अन्यथा बदनामी करेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी कलम 376, 354, 384 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only