Sunday, June 27, 2021

फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तोफखाना पोलिसात मारहाण, विनयभंग व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखलमजुरीच्या कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून पती-पत्नीला जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तसेच फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तोफखाना पोलिसात मारहाण, विनयभंग व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही घटना 23 जून व 26 जून रोजी घडली. या प्रकरणी रमेश तांदळे व गोरख तांदळे (रा. लेखानगर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे पती बिगारी काम करत असून, 17  व 18 जून रोजी सेंट्रिंगच्या कामासाठी रमेश तांदळे यांच्याकडे गेले होते. 23 जून रोजी फिर्यादीच्या तांदळे यांना फोन करुन कामाच्या मजुरीची रक्कम मागितली असता, तांदळे याने रक्कम देण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर 26 जूनरोजी फिर्यादीचे पती घरात नसताना गोरख तांदळे याने घरात येऊन फिर्यादीच्या मुलीचा हात धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.फिर्यादीने तांदळे याला जाब विचारल्यावर त्याने त्याचे हातातील कुर्‍हाड दाखवून मारण्याची धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचवेळी फिर्यादीचे पती घरी परतल्याने त्यांनी माझे कामाचे पैसे घेवून आला काय, असे विचारले असता, पैसे नाही आणले, पण तू माझे भावाला फोन वर काय बोलला, असे म्हणत तांदळे हा हातातील कुर्‍हाडीचे दांड्याने मारण्यास धावला. फिर्यादीने घराचे दार लावून घेतल्यावर घराच्या दरवाजावर व पत्र्यावर मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only