Wednesday, June 9, 2021

दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी केली अटकनगर दि 9 प्रतिनिधी 


तोफखाना पोलीसांनी कोंबिंग ओपरेशन दरम्यान नगर शहरातुन बळजबरीने मगळसुत्र चोरणा-या व बाललैंगिक अत्याचारातील गुन्हेगारास ठोकल्या चोवीस तासाचे आत जेरबंद केले आहे


प्रकाश रावसाहेब उमाप वय 20 रा. वारुळाचा मारुती जवळ नालेगांव, सलमान उर्फ मायकल एजाज शेख रा. सहारा कॉर्नर 01 नं गल्ली मुकुंद नगर  असे आरोपीचे नाव आहे.


 रोजी कॉबिंग ऑपरेशन दरम्यान तोफखाना पोलीस स्टेशन हददीतील दाखल असलेल्या तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.न./ 457/2021 भा.द.वी 392,354(ड), 34 गुन्हयातील पाहीजे असलेल्या आरोपींची गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेवुन आरोपी   सलमान उर्फ मायकल एजाज शेख रा. सहारा कॉर्नर 01 नं गल्ली मुकुंद नगर ,नगर हा मिळुन आल्याने सापळा रचुन अतिशय शिताफीने अटक केले तसेच तोफखाना पो.स्टे.गु.र.नं./ 453/2021 भादवी कलम 354,354(ड), 504,506 बाल लैंगिक अपराधापासुन  फरार आरोपी  प्रकाश रावसाहेब उमाप वय 20 रा. वारुळाचा मारुती जवळ नालेगांव,नगर यांना शहरातुन अटक केले.


सदर कारवाई  पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, . अपर पोलीस अधिक्षक  सौरभ अग्रवाल ,. उपविभागिय पोलीस अधिकारी . शहर विभाग विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक  तोफखाना पोलीस स्टेशन सुनिल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक सुरज मेढे, पोहेकॉ,शकील सय्यद पोना अविनाश वाकचौरे, पोना वसिम पठाण, पोना अहमद ईनामदार, पोका  शैलेश गोमसाळे, पोकॉ सचिन जगताप यांनी महत्वाची कामगीरी केली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only